धक्कादायक, बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

आई-वडिलांसोबत राहणारा अजय प्लंम्बरच काम करत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. तर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. पोलिसांना अजयच्या खोलीत एक सुसाईड नोट मिळाली.

After Rejection of 'Propose Day' from a friend Boyfriend commits suicide in nashik
'प्रपोज डे'ला मैत्रिणीकडून नकार, दुख: पचवू न शकल्याने प्रियकारने संपवले आयुष्य

नवरा आणि बायकोमध्ये लहान-सहान कारणांमुळे कुरबुरी होत राहतात. काही वेळेला तात्काळ भांडणे मिटतात. पण अनेकदा यातून टोकाची पावलेही उचलली गेली आहेत. आत्महत्या करण्याची वेगवेगळी कारणे आपण ऐकत असतो. पण आता एका विचित्र कारणामुळे एका तरूणाने आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे. बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून एका नवविवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे रविवारी रात्री  घटना घडली आहे.

अजय समाधान साबळे (25) असे या तरूणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोटही लिहिली. रविवारी रात्री अजयने व्हॉट्सअपवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवले. त्याचे स्टेटस् बघून त्याचा एक मित्र रात्री १२ वाजता त्यांच्या घरी आला. तो त्याच्या खोलीत गेला असता अजयने गळफास घेतल्याचे दिसून आले.  त्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अजयला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आई-वडिलांसोबत राहणारा अजय प्लंम्बरच काम करत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. तर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. पोलिसांना अजयच्या खोलीत एक सुसाईड नोट मिळाली. या सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले की, पत्नी माझ्यापेक्षा वयाने ५ वर्षे मोठी आहे. तिला नीट स्वयंपाक येत नाही. चांगली साडी घालता येत नाही. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते. या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.