घरमहाराष्ट्रकाँग्रेसचे टी-शर्ट घालून तरूणाने घेतला गळफास

काँग्रेसचे टी-शर्ट घालून तरूणाने घेतला गळफास

Subscribe

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट

गुरूवारी सकाळी ९ वाजता काँग्रेस या राजकीय पक्षाचे चिन्ह असलेले टी शर्ट अंगात घालून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या करत असताना तरूणाने झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गावात घडली.

या आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव सतीश गोविंद मोरे असून त्याचे वय २१ वर्ष होते. सतीश या तरूणाचे शिक्षण पुर्ण झाले असून हा तरूण बेरोजगार असल्याने मोलमजूरी करून कुटुंबाला आधार देत होता. या तरूणाच्या घरी आई-वडील आणि एक भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र य़ा आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनास्थळी पोलिसांनी भेट देत सतीश या तरूणाचा मृतदेह बुलडाण्यातील एका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

बुलढाण्यातील एकाच आठवड्यात दुसरी घटना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १३ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे प्रचार दौरा होता मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली होती. यावेळी भाजपचे टी शर्ट घालून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असा संदेश लिहिलेले टी शर्ट घालून राजू तलवारे नामक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. ही घटना बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील खातखेड या गावात घडली होती.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -