घरमुंबईअवधूत तटकरे यांचा आमदारकीचा राजीनामा

अवधूत तटकरे यांचा आमदारकीचा राजीनामा

Subscribe

लवकरच शिवसेनेत करणार प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरुवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपविला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट देखील आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.

अवधूत तटकरे हे लवकरच राष्ट्रवादीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे अवधूत यांनी भेटीनंतर सांगितले होते. गुरुवारी अखेर अवधूत तटकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे लवकरच ते शिवसेनेते प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

- Advertisement -

सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच अवधूत तटकरे हे नाराज होते. तटकरे कुटुंबातील राजकीय महत्त्वाकांक्षामुळे हा वाद सुरु आहे. रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. सर्व काही सुरळीत झाल्याची चर्चा असतानाच श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि त्यांचे वडील अनिल तटकरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -