घरमुंबईCoronaVaccine: मुंबईतील १ लाख २७ हजार ३५१ महिलांनी घेतला लसीचा डोस

CoronaVaccine: मुंबईतील १ लाख २७ हजार ३५१ महिलांनी घेतला लसीचा डोस

Subscribe

कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेने १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत सर्व घटकांसोबतच महिलांसाठीही १७ सप्टेंबर रोजी विशेष लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार सरकारी, पालिका व खासगी लसीकरण केंद्रांवर एका दिवसात तब्बल १ लाख २७ हजार ३५१ महिलांनी घेतला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती पालिका आरोग्य यंत्रणा व जनसंपर्क खाते यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. पालिका आरोग्य यंत्रणेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाची पहिली लाट जानेवारी २०२१ च्या आसपास नियंत्रणात आली होती. तर काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची दुसरी लाटही मुंबईत धडकली व तिच्यावरही पालिका आरोग्य यंत्रणेने यशस्वी उपाययोजना करून नियंत्रण मिळवले. मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.
या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी पालिकेने समाजातील सर्वच घटकांतील नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याचा विडा उचलला आहे.

- Advertisement -

पालिका आरोग्य यंत्रणेने १६ जानेवारीपासून ते १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत राबविलेल्या लसीकरण मोहीमेच्या अंतर्गत हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षीय नागरीक, ४५ – ५८ वयोगट, १८ – ४४ वयोगट, स्तनदा माता , गर्भवती महिला, विदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी, अंथरुणावर खिळून असलेले आजारी, दिव्यांग व्यक्ती आदींना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याचा उपक्रम राबवला आहे. मात्र १७ सप्टेंबर रोजी पालिकेने, सरकारी, पालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवला. दिवसभरात १ लाख २७ हजार ३५१ महिलांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. या लसीकरण मोहिमेमुळे लसीचा डोस घेतलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.


महाविकास आघाडीतील नेते मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटून बसलेत, दरेकरांचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -