घरमुंबईअकरावी विशेष फेरीसाठी 1 लाख 61 हजार जागा

अकरावी विशेष फेरीसाठी 1 लाख 61 हजार जागा

Subscribe

वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक जागा उपलब्ध

अकरावी प्रवेशाच्या तीन फेर्‍या संपल्या असून आजपासून विशेष फेरीला सुरुवात होत आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या इच्छेपायी अद्यापपर्यंत अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. तिसरी फेरी संपल्यानंतर मात्र अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनात आता प्रवेश मिळेल का अशी शंका निर्माण झाली आहे. परंती अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागामध्ये विशेष फेरीसाठी तब्बल 1 लाख 61 हजार 843 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा कॉमर्सच्या आहेत.

मुंबई विभागामध्ये अकरावी प्रवेशासाठी असलेल्या 3 लाख 19 हजार 186 जागांसाठी फक्त 1 लाख 85 हजार 477 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 55 हजार 328 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तर तब्बल 1 लाख 61 हजार 843 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये नामांकित कॉलेजच्या जागा रिक्त असण्याची शक्यता कमी असल्या तरी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित मिळणार याची शाश्वती आहे.

- Advertisement -

रिक्त राहिलेल्या जागांमध्ये कॉमर्सच्या सर्वाधिक 63 हजार 105 जागा उपलब्ध असून, त्याखालोखाल सायन्सच्या 44 हजार 81, आर्ट्सच्या 16 हजार 229 आणि एमसीव्हीसीच्या 3151 जागा आहेत. त्याचबरोबर अल्पसंख्यांक कोटा, इनहाऊस कोटा व मॅनेजमेंट कोट्यातील जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत. यामध्येही कॉमर्सच्या 18 हजार 275, सायन्स 11 हजार 72, आर्ट्सच्या 5300 व 630 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहेत.

मुसळधार पावसामुळे अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना 9 व 10 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर गुणवत्ता यादी 14 ऑगस्टला जाहीर होणार आहे. या फेरीमध्येही प्रवेश न मिळणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम येणार्‍यास प्राधान्य या पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. ही फेरी 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

- Advertisement -

विशेष फेरीसाठी उपलब्ध जागा
शाखा -एकूण जागा -कोट्यातील जागा -कोट्यातील प्रवेश -प्रवेश
आर्ट्स -16229 -5300 -3881 -12156
कॉमर्स -63105 -18275 -27684 -66562
सायन्स -44081 -11072 -9327 -33839
एमसीव्हीसी -3151 -630 -312 -1567
एकूण -126566 -35277 -41204 -114124

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -