घरमुंबई१० वी, १२ वीच्या परीक्षेसाठी १० मिनिटे वाढीव वेळ

१० वी, १२ वीच्या परीक्षेसाठी १० मिनिटे वाढीव वेळ

Subscribe

१० वी, १२ वीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे अतिरिक्त वेळ वाढवून देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतला आहे. वेळेसंबंधीची सुधारणा मंडळाने परिपत्रक जारी करून केली आहे. १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय मंडळाने नुकताच घेतला होता, मात्र पालकांचा आग्रह लक्षात घेऊन मंडळाने आपला निर्णय मागे घेतला आहे.

याआधी १० वी, १२ वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका आकलनासाठी देण्यात येत होत्या, मात्र त्यामुळे प्रश्नपत्रिका मोबाईल तसेच सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याच्या अफवा आणि घटना घडल्या होत्या. कॉपीच्या घटनांना आळा घालण्यासाठीच मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षांपासून प्रश्नपत्रिका १० मिनिटे आधी देण्याचा नियम रद्द केला, परंतु कोरोना काळात बहुतांश परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याचे मत व्यक्त करीत पालकांनी हा निर्णय मागे घेण्याचा आग्रह मंडळाला केला. त्यानंतर मंडळाने पालकांची मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील सुधारणा मंडळाने परिपत्रक काढून जारी केली आहे.

- Advertisement -

परीक्षेची सध्याची वेळ

सकाळचे सत्र
स. ११.०० ते दु. २.००
स. ११.०० ते दु. १.००
स. ११.०० ते दु. १.३०

- Advertisement -

दुपारचे सत्र
दु. ३.०० ते सायं. ६.००
दु. ३.०० ते सायं. ५.००
दु. ३.०० ते सायं. ५.३०

परीक्षेची सुधारित वेळ

सकाळचे सत्र
स. ११.०० ते दु. २.१०
स. ११.०० ते दु. १.१०
स. ११.०० ते दु. १.४०

दुपारचे सत्र
दु. ३.०० ते सायं. ६.१०
दु. ३.०० ते सायं. ५.१०
दु. ३.०० ते सायं. ५.४०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -