घरमुंबईलेडीज बारमध्ये उडवले पैसे आणि पकडली गेली चोरट्यांची टोळी

लेडीज बारमध्ये उडवले पैसे आणि पकडली गेली चोरट्यांची टोळी

Subscribe

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्यांची टोळी पकडण्यात डोंबिवली पोलिसांना यश आले आहे.

कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी आता चोरट्यांच्या लाइफस्टाइलवर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. रेकॉर्ड वरील चोरट्यांवर नजर ठेऊन जो चोरटा जास्त पैसे खर्च करतो त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली जाते. याचाच फायदा मानपाडा पोलिसांना झाला असून, चोरट्याच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याने त्याच्या दोन साथीदारांसह डोंबिवली एमआयडीसीतील सहा कंपन्यांमध्ये ११ लाखाची चोरी केली होती. याप्रकरणी रफिक शेख, प्रकाश सूर्यवंशी या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कंपन्यांमध्ये केली होती ११ लाखांची चोरी

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसात विविध कंपन्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस हैराण झाले होते. काही कंपन्यांमधून संपूर्ण फिल्टर प्लांटच चोरीला गेले होते. मानपाडा पोलिसांनी या सर्व चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरु केला.  पोलिसांनी  रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर विशेष नजर ठेवायला सुरुवात केली. पोलिसांची तीन ते चार टीम चोरट्यांवर विशेष नजर ठेवून होते. रेकॉर्डवरील गुन्हेगार करतो काय? राहतो कुठे? पैसे आणतो कुठून? या सर्व गोष्टींवर पोलिसांची बारकाईने नजर होती. या दरम्यान, रियाज रमजान खान या चोरट्यावर पोलिसांची नजर गेली. एका बारमध्ये रियाजने पैश्याची उधळपट्टी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चोरट्यांच्या टोळीचा उलगडा झाला.

- Advertisement -

हेही वाचा – लॅपटॉप चोरी करुन बॅग परत करणार्‍या रिक्षाचालकास अटक

हेही वाचा  – आजारी मुलासाठी घेतलेल्या मोबाईलची चोरी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -