Mumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,११५ नवे रुग्ण, तर ५७ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार ३६१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Mumbai Corona Update: मुंबईतील रुग्णसंख्या वाढली, आज ३,६७१ नव्या रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू
Mumbai Corona virus Update 3,671 new covid-19 positive patients registered in mumbai today

राज्यभरासह मुंबईतही कोरोनाचा कहर सुरू असून मुंबईत आज १ हजार ११५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ०९ हजार ०९६ वर पोहचली आहे. तर ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ०९० वर पोहचला आहे. तर आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार ३६१ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ८० हजार २३८ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आज दिवसभरात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३५ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ५ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३६ जण हे ६० वर्षांवरील, तर १८ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८६९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७६ हजार ७३७ वर पोहोचली आहे. तसेच १ हजार ३६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ८० हजार २३८ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात ९,४३१ कोरोना रुग्णांची नोंद; तर २६७ जणांचा मृत्यू