घरमुंबईड्रग्ज विकणारे १२ नायजेरीयन अटकेत

ड्रग्ज विकणारे १२ नायजेरीयन अटकेत

Subscribe

भाषेमुळे पोलिसांच्या तपासात अडचणी

मुंबई:- दोन महिन्यापूर्वी भायखळा पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळून अंमली पदार्थांची विक्री करणार्‍या १२ नायजेरीयन तरुणांना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र या अटकेच्या दोन महिन्यानंतरही पोलिसांनी केलेल्या तपासात कोणतीच ठोस माहिती हाती लागली नाही. हे नायजेरीयन ड्रग्ज कोठून आणत होते आणि कसेे आणत होते हे सगळे प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने जूनमध्ये एकाच वेळी केलेल्या कारवाईत ९ नायजेरीयन तरुणांना ड्रग्ज विकताना अटक केली. त्यानंतर जुलैमध्ये भायखळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन नायजेरीयन तरुणांना एकता नगर परिसरातून ड्रग्स विकताना अटक केली होती.

अटक करण्यात आलेले नायजेरीयन तरुण प्रामुख्याने नालासोपारा, नायगाव, खारघर, कोपरखैरणे या भागात राहत होते. पण त्यांच्याकडे एवढा मोठा ड्रग्जचा साठा कुठून येतो, याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.तपासादरम्यान आरोपींची चौकशी करत असताना भाषेची अडचण येत असल्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळवणे कठीण होऊन बसले आहे. भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बर्‍याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणातच ड्रग्सची विक्री होत होती. एकता नगरच्या रेल्वे लाईनजवळच्या परीसरात असणार्‍या झोपडपट्टी परीसरात या नायजेरीन तरुणांना भायखळा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पकडताना अनेक अडचणींना पोलिसांना सामोरे जावे लागले होते. पण त्यांच्या अटकेनंतर मात्र अद्याप त्यांच्या या ड्रग रॅकेटबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

- Advertisement -

दरम्यान दोन महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईनंतर या भागात ड्रग्ज विक्रीचे प्रमाण कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. १० ऑक्टोबर रोजी पुन्हा या भागातील पोलीस,रेल्वे पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने गस्त घातली. रात्री १ वाजल्यापासून पहाटे ५ पर्यंत ही गस्त सुरू होती, पण एकही नायजेरीयन या परीसरात ड्रग्ज विक्री करताना दिसला नाही. त्यामुळे या भागात हे प्रमाण कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.

पोलिसांनी वापरली खास ट्रिक

- Advertisement -

नायजेरीयन तरुण शरीराने मजबूत असल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी एका वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला होता. रात्रीच्या वेळी धाड टाकण्यात येत होेती. पोलिसांचे संख्याबळ जरी कमी असले तरी शिट्ट्यांचा वापर करुन जास्त जण आहोत असे भासवण्यात येत होते. हे तरूण वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाताना त्यांना अटक केली होती. त्यानंतर दुसर्‍याच महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच वेळी केलेल्या कारवाईत रेल्वे स्टेशन परीसरातून तब्बल ९ नायजेरीयन तरुणांना अटक केली होती.

एकता नगर रेल्वे परिसराच्या बाजूला असणार्‍या झोपडपट्टीत हे नायजेरीयन ड्रग्ज विकत असत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही त्यांना अटक केली होती. यावेळी त्यांनी काही पोलिसांना जखमीसुद्धा केले होते. पण त्यानंतर आतापर्यंत भाषेची अडचण येत असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त माहिती मिळू शकली नाही. जर त्यांच्याकडून जास्त माहिती उपलब्ध झाली तर त्यांच्याकडे हे अंमली पदार्थ कुठून येतात याचा शोध लागू शकतो. त्यामुळे हे प्रकार थांबवले जाऊ शकतात.
-रमेश मोरे, पोलीस निरीक्षक, भायकळा पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -