घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,३९० नवे रुग्ण, तर ६२ जणांचा...

Mumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,३९० नवे रुग्ण, तर ६२ जणांचा मृत्यू

Subscribe

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९६ हजार २५३ वर पोहचली आहे

मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज मुंबईत कोरोनाचे १ हजार ३९० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९६ हजार २५३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५४६४ वर पोहचला आहे.

आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार १९७ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ६७ हजार ८३० रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज १ हजार ३९० नवे रुग्ण सापडले असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४१ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३८ जण हे ६० वर्षांवरील, तर २१ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ६२ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ९९६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार ४७८ वर पोहचली आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

२४ तासात १ हजार १९७ कोरोना रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६७ हजार ८३० इतकी आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ७०% आहे. तर सध्या कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा २२ हजार ९५९ आहे.


Corona Update: राज्यात २४ तासांत ७,९७५ नवे रूग्ण; २३३ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -