घरताज्या घडामोडी... तर मुंबईत लॉकडाऊन अटळ

… तर मुंबईत लॉकडाऊन अटळ

Subscribe

कोरोना रुग्ण संख्येत अशीच वाढ होत राहिली तर नाईलाजास्तव मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईकरांना दिला आहे.

मुंबईत लग्न सराई, विविध कार्यक्रम, बाजारहाट, लोकल ट्रेन आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोक बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. मुंबईकरांनी वेळीच सावध व्हावे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, गर्दी टाळावी. कोरोना रुग्ण संख्येत अशीच वाढ होत राहिली तर नाईलाजास्तव मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईकरांना दिला आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊन कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र १ मार्चपासून कोरोना रुग्ण संख्येत काहीशी वाढ होऊ लागली आहे. १ मार्च रोजी रुग्ण संख्या ८५५ वर आणि कोरोनामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या ४ वर होती. तर ८ मार्च रोजीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १३६० वर गेली व कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ५ वर गेली. त्यामुळे पालिका खडबडून जागी झाली आहे.

- Advertisement -

मुंबई शहर व उपनगरात लग्न सोहळे, कार्यक्रम या निमित्ताने नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणीही मास्क न घालता मोकाट फिरताना आढळून येत असून पालिकेच्या दंडात्मक कारवाईवरून दिसून येत आहे. दादर मार्केट व अन्यत्र खरेदीच्या निमित्ताने नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे पालिकेने कोरोना कायमचा हद्दपार होत नाही तोपर्यंत नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करायला पाहिजे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी केले आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी मुंबईकरांना दिला आहे.


हेही वाचा – Corona Update: मुंबईकरांनो सावध व्हा! नाहीतर होईल लॉकडाऊन

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -