घरमुंबईएमबीएचे १८४ प्रवेश रद्द

एमबीएचे १८४ प्रवेश रद्द

Subscribe

खोटी माहिती सादर करणार्‍यांवर होणार कारवाई

व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाला परीक्षांची खोटी गुणपत्रके व माहिती सादर करणार्‍या 187 विद्यार्थ्यांच्या चौकशी समितीचा अहवाल बुधवारी तयार झाला. खोटी माहिती सादर करून प्रवेश घेतलेल्या 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले असून, त्यामध्ये मुंबईतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेशातील गैरकारभाराला आळा घालण्यासाठी सीईटीकडून ‘सार’ पोर्टल सुरू केले होते. परंतु सर्व्हरमध्ये आलेल्या समस्येमुळे हे पोर्टल बंद करून जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्याचा गैरफायदा घेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला.

राज्यभरातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे एमबीए किंवा एमएमएस प्रवेश सीईटी सेलच्या माध्यमातून होतात. यासाठी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटची कॅटची परीक्षा, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची सीमॅट परीक्षेबरोबरच काही संस्थांकडून परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांचे गुण एकत्रित प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी खोटी माहिती व बोगस कागदपत्रे सादर करून तसेच नावात बदल करुन चुकीचे गुण दाखवून प्रवेश मिळवल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर प्रवेश नियमन प्राधिकरणाने याबाबत चौकशी केली असता त्यामध्ये 187 विद्यार्थ्यांनी खोटी माहिती सादर केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे प्रवेश समितीने या सर्व विद्यार्थ्यांना दोषी ठरवले. मात्र विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडता यावी यासाठी प्रवेश समितीने या सर्व विद्यार्थ्यांना ईमेल द्वारे सूचना पाठवली. तसेच त्यावर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदतही दिली. परंतु या कालावधीत एकाही विद्यार्थ्यांनी प्राधिकरणाकडे संपर्क साधलेला नाही. खोटी माहिती सादर करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये 150 विद्यार्थ्यांनी चुकीची गुणपत्रिका सादर केली आहे. 37 विद्यार्थ्यांनी चुकीचे नाव व चुकीची माहिती सादर केल्याचे पडताळणीमध्ये आढळून आले. तसेच 25 विद्यार्थ्यांनी संस्थांमध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित केल्याचे पडताळणीत उघडकीस आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल समितीने प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे पाठवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काय कारवाई करण्याबाबतचा निर्णय प्राधिकरणाकडून घेतला जाणार आहे.

- Advertisement -

‘सार’मध्ये प्रकार रोखता आले असते
सार पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी पहिल्या टप्यात करण्यात येणार होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे पोर्टल इंजिनिअरिंग प्रवेशावेळी बंद करत तंत्र शिक्षण विभागाच्या जुन्या पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आली. सार पोर्टलमुळे पहिल्या टप्प्यातच बोगस विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडले असते अशी चर्चा सीईटी सेलमध्ये सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -