घरठाणेउल्हासनगरात राजकीय भूकंप ,२२ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांचा गृहनिर्माण मंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर...

उल्हासनगरात राजकीय भूकंप ,२२ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांचा गृहनिर्माण मंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश,

Subscribe

ओमी कलानी टीमचे स्वगृही दणक्यात प्रवेश; बीजेपीला भगदाड , उल्हासनगरात राष्ट्रवादीचाच महापौर होणार - पंचम कलानी यांचा दावा

उल्हासनगरात बुधवारी राजकीय भूकंप झाला आहे. ओमी कलानी टीमने ठाण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये विद्यमान २२ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या घरवापसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उल्हासनगरमधील ताकद वाढली आहे. तसेच आणखी १० नगरसेवक संपर्कात असल्याचेही यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.याशिवाय कांबाच्या संरपच यांच्यासह वरप आणि म्हारळच्या उपसरपंच व सदस्यांनीसुध्दा राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर आरपीआय व पीआरपीच्या प्रत्येकी एक नगरसेवकाने प्रवेश केला अशाप्रकारे एकूण ११४ जणांचा राष्ट्रवादीचा प्रवेश झाला आहे. याचदरम्यान माजी महापौर आणि ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांची राष्ट्रवादी उल्हासनगर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना डॉ.आव्हाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना, पंचम कलानी यांनी उल्हासनगरात राष्ट्रवादीचा महापौर होईल, असाही दावा केला आहे.

ठाण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यावेळी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार्‍या नगरसेवकांमध्ये पंचम ओमी कलानी, डिंपल ठाकूर नगरसेविका तथा सभापती सार्वजनिक बांधकाम विभाग, शुभांगी निकम नगरसेविका, दीपा पंजाबी टिपीडी चेअरमन तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती २ तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती २ तथा नगरसेविका, हरेश जग्यासी सभापती – प्रभाग समिती १ तथा नगरसेवक, कविता गायकवाड, महसूल सभापती तथा नगरसेविका, दिप्ती दुधानी, सभापती प्रभाग समिती ३ तथा नगरसेविका, दिनेश लिहरानी परिवहन समिती सभापती, रेखा ठाकूर – नगरसेविका, सरोज टेकचंदानी नगरसेविका, आशा भिराडे – नगरसेविका, सविता तोरणो-रगडे – नगरसेविका, रविंद्र बागुल नगरसेवक, मनोज लासी, नगरसेवक, चंद्रावती देवीसिंग, नगरसेविका, ज्योती पाटील नगरसेविका, ज्योती चैनानी नगरसेविका, गजानन शेळके नगरसेवक, मंगल वाघे आरपीआय नगरसेवक, प्रमोद तळे पीआरपी नगरसेवक यांचा समावेश आहे. तर, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीचे भारती भगत सरपंच – कांबा गाव, संदिप पावशे उपसरपंच – कांबा गाव, निलेश देशमुख उपसरपंच – म्हारळ गाव, हरिदास पवार सदस्य – कांबा गाव, संतोष पावशे सदस्य – कांबा गाव, ईशा भोईर सदस्य – कांबा गाव, सोनाली उबाळे सदस्य – कांबा गाव, छाया बनकर सदस्य – कांबा गाव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी, मोहन गारो, राजू खंडागरे, होशियारसिंग लबाना, बाबू मंगतानी, लोकूमल कारा, हिरो केवलरामानी, ठाकूर चांदवानी, श्याम मेजर, मिनू दासानी, प्रिथ्वी वलेचा, राजू टेकचंदानी, गिरीधारी वधवा, भगवान लिंगे, फिरोज खान, गोदू क्रिष्णानी, गजानन बामणकर, आंबू भिटजा, कमला क्रिष्णानी आदींचा त्यात समावेश आहे.

- Advertisement -

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, कलानी कुटुंबियांसह अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेवरून या सर्वांना पक्षात प्रवेश दिला आहे.

राष्ट्रवादीने ३२ नगरसेवकांचा प्रवेश झाल्याचा दावा यावेळी केला आहे. परंतु प्रत्यक्षात व्यासपाठीवर तीन ते चार नगरसेवकच उपस्थित होते. तर इतर नगरसेवकांच्या नातेवाईकांनी यावेळी पक्षात प्रवेश केला आहे. याच मुद्यावरून आव्हाड यांना छेडले असता, उर्वरित नगरसेवक देखील येत्या काही दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. तसेच पक्षबंदीचा कायदा असल्याने आता नगरसेवक हजर राहू शकलेले नाहीत. परंतु येत्या काळात ते राष्ट्रवादीत दिसतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर पंचम कलानी यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या कलानी आहेत, कोणाला घाबरत नाही, असे आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

भिवंडी पाठोपाठ उल्हासनगरात धक्का दिला आहे. आगामी काळातही हळूहळू धक्के दिले जातील. आता ट्रेलर दाखवला आहे. मेन पिक्चर बाकी आहे. या पक्षप्रवेशामुळे उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने उल्हासनगरात झेंडा फडकविणे आता अवघड होणार नाही. तसेच कलानी कुटुंब आल्याने उल्हासनगरात राष्ट्रवादी पसरले यात शंकाच नाही.
– डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -