घरCORONA UPDATECoronaVirus: शुश्रूषा हॉस्पिटलमधल्या २ डॉक्टर्स आणि ६ नर्सेसना कोरोनाची लागण!

CoronaVirus: शुश्रूषा हॉस्पिटलमधल्या २ डॉक्टर्स आणि ६ नर्सेसना कोरोनाची लागण!

Subscribe

मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील काही हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर आणि सहा नर्सेसना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांसाठी शुश्रूषा हॉस्पिटल बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान हॉस्पिटमध्ये निर्जंतुकीकरण्यात करण्यात येणार आहे. त्यानंतरच हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सेसना कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व शंभर टास्फच्या टेस्ट करण्यात येणार आहेत. जर निगेटिव्ह रिपोर्ट आले तर पुन्हा काम सुरू करणार असल्याची माहिती वॉर्ड ऑफिसने दिली आहे. मुंबईतील मधील हॉस्पिटमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे अजून मुंबईत चिंतेत भर पडत आहे. गेले दोन दिवसपासून मुंबईत कोरोनाचे २०० हून अधिक रुग्ण आढळतं आहेत. आज मुंबईत कोरोनाचे २४ तासात २१७ नवे रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची आकडा १३९९वर पोहोचला आहे.

- Advertisement -

मुंबईत रविवारी १६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९१ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत २६ रुग्ण बरे झाले असून हॉस्पिटलमधून घरी पाठवलेल्या रुग्णांची संख्या ९७ वर पोहचली आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.


हेही वाचा – घाटकोपरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, १२ दिवसांमध्ये केवळ ९ रुग्णांची वाढ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -