Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये एका २६ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नायर हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ विभागातील (anaesthesia department) २६ वर्षीय डॉक्टरने सोमवारी रात्री आत्महत्या केली असून या मृत डॉक्टरचे नाव डॉ. संदेश तुपे आहे. डॉक्टरांचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला आणि त्याला पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisement -

नायर हॉस्पिटलचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, या डॉक्टरांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही आणि पुढील तपासणीसाठी मृतदेह अग्रिपाडा पोलिस ठाण्यात सोपविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नायर हॉस्पिटलमधील २८ वर्षीय डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच मध्यरात्री त्याने स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला असून, विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या आत्महत्येची ही पहिली घटना नाही, तर यापूर्वी २६ वर्षीय डॉक्टर पायल तडवी यांनी २२ मे २०१९ रोजी आत्महत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार संध्याकाळी ७ वाजेनंतर उघडकीस आला. २०१९ मध्ये प्रसूति व स्त्रीरोग विभाग पायल ताडवी यांना सतत संपर्क करत होते, परंतु त्यांनी या फोनला कोणतेही उत्तर दिले नाही.

- Advertisement -