घरमुंबईतराफा दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ तर ३४ जण अद्याप बेपत्ता

तराफा दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ तर ३४ जण अद्याप बेपत्ता

Subscribe

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात तराफे (बार्ज) भरकटले होते. या दुर्घटनेत आता आणखी 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांची संख्याही 41 वर पोहोचली आहे. तर आणखी 34 जण बेपत्ता आहेत. नौदलाचे जवान बेपत्ता कर्मचार्‍यांचा शोध घेत आहेत.

मुंबईच्या खोल समुद्रात चार तराफ्यांवर एकूण 707 खलाशी आणि कर्मचारी उपस्थित होते. या तराफ्यांचे नांगर तुटल्याने खवळलेल्या समुद्रात ते भरकटले होते. बार्ज भरकटल्याची माहिती मिळताच नौदलाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत 611 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरूच आहे.

- Advertisement -

पी-305 या तराफ्यावर एकूण 261 कर्मचारी होते. त्यापैकी 188 कर्मचार्‍यांना नौदलाने वाचवले आहे. आयएनएस कोच्ची या युद्धनौकेच्या सहाय्याने या कर्मचार्‍यांना वाचवण्यात आले आहे. ताशी 100 किमी वार्‍याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करून कर्मचार्‍यांना वाचवले आहे. गुरुवारी सकाळी काही कर्मचार्‍यांचे मृतदेह सापडले होते. तर दुपारी आणखी काही कर्मचार्‍यांचे मृतदेह सापडले आहे. आतापर्यंत एकूण 41 जणांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी 34 जणांचा शोध सुरू आहे.

कॅप्टनचा निर्णय चुकला आणि 261 कर्मचारी अडकले!
समुद्रात तौत्के चक्रीवादळ येणार याची पूर्व कल्पना असतानाही तराफा पी-305 च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओएनजीसीच्या तेल उत्खनन प्रकल्पावर काम करण्याचे कंत्राट अ‍ॅफकॉन कंपनीकडे होते. याच अ‍ॅफकॉन कंपनीने नियुक्त केलेले 261 कर्मचारी तराफा पी-305 वर होते.

- Advertisement -

पी – ३०५ बार्ज प्रकरणी येलोगेट पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद
समुद्रात ओएनजीसीसाठी तेल उत्तखनन करणार्‍या पी – ३०५ बार्जला तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला असून हे बार्ज समुद्रात बुडाल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३८ जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दोन दिवसापासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. बुधवारपासून मुंबईतील जे.जे रुग्णालयात ३७ जणांचे मृतदेह आणण्यात आले आहे. या प्रकरणी येलोगेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -