घरमुंबईयोग्यवेळ आल्यास राष्ट्रीय आपत्ती जाहीर करू - मुख्यमंत्री

योग्यवेळ आल्यास राष्ट्रीय आपत्ती जाहीर करू – मुख्यमंत्री

Subscribe

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीवर आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर एका पत्रकार परिषदेत सद्यपरिस्थितीची माहिती दिली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीवर आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर एका पत्रकार परिषदेत सद्यपरिस्थितीची माहिती दिली. यावेळी राज्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीष महाजन आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सांगलीत बोट उलटून पाण्यात बुडालेल्या तसेच पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्यां कुटुंबियांना सरकारतर्फे ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. तसेच पश्चिम महाराष्टात योग्य वेळ आल्यास राष्ट्रीय आपत्ती जाहीर करू, असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री –

  • कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सर्व प्रकारची मदत पोहोचवली जात आहे.
  • कोल्हापूरहून सांगली आणि नंतर कराडला जाऊन आपण भेट देणार होतो. मात्र परिस्थितीमुळे त्याची परवानगी दिली नाही.
  • मदतकार्यासाठी सैन्य, एनडीआरएफ, पोलिसांकडून मदत मिळाली.
  • पंजाब, गोवा, गुजरातमधून मदत आणली.
  • हवामानामुळे मदत मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
  • आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूरपरिस्थिती.
  • सांगलीतील स्थिती अतिशय गंभीर.
  • हवामानामुळे सांगली दौरा रद्द करावा लागला.
  • एअर लिफ्टींग करण्याचाही विचार आहोत. पण त्यासाठी योग्य परिस्थिती हवी.
  • अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
  • वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये लोकांची सोय करण्यात आली आहे. साधारण ६० बोटी कार्यरत आहेत.
  • कोल्हापूरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • ३८१३ घरं पडली आहेत. ८९ घरं बाधित आहेत.
  • पाणी ओसरल्यानंतर नेमका आकडा समोर येईल. ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांनाही मदत करणार आहोत.
  • ८ हजारांहून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.
  • कोल्हापूरातील १८ गावांना पुराचा वेढा
  • ६८ हजार हेक्टर जमिनीवरची पीकं नष्ट झाली आहेत
  • ऊसाच्या शेतातही पाणी शिरलं आहे
  • सध्या आवश्यक औषधं पुरवली आहे. आवश्यक असल्यास अधिकची औषधं देण्यात यावी.
  • राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.
  • कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत चर्चा सुरु आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -