घरमुंबईडाएटवर जावं लागणार; कारण मुंबईकरांची वाढते 'चरबी'

डाएटवर जावं लागणार; कारण मुंबईकरांची वाढते ‘चरबी’

Subscribe

मुंबईकरांची 'चरबी' वाढल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे वेळेत वजन वाढीला आळा घाला आणि फिट रहा, असे आवाहन यातून करण्यात आले आहे.

सध्याच्या धावपळीचा मुंबईकरांच्या शरीरावर मोठा परिणाम होत आहे. अनेकदा नोकरीनिमित्त बाहेर पडल्यानंतर हे मुंबईकर बाहेरचे फास्टफूड खातात आणि त्यामुळे मुंबईकरांच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊन बऱ्याच व्यक्तींना काहीना काही त्रास, दुखणे सतावत असते. अनेकदा चुकीच्या पद्धतीचा आहारात समावेश केल्याने तर काही वेळा अपुऱ्या झोपेमुळे. मात्र, आता याचा परिणार शरीरात वाढणाऱ्या चरबीवर देखील होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील ५० टक्के नागरिकांमध्ये चरबीचे प्रमाण वाढले असल्याचे मेट्रोपोलिज हेल्थ केअरया कंपनीने तीन वर्षांत केलेल्या १० लाख नागरिकांच्या पाहणीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

५० टक्के नागरिकांमध्ये एचडीएलचे प्रमाण वाढले

मेट्रोपोलिज हेल्थ केअरया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात चरबीमध्ये आवश्यक असलेले एचडीएलहे लिपो प्रोटीनप्रथिनही कमी प्रमाण आढळले आहे. ‘मेट्रोपोलिज हेल्थ केअरकेलेल्या नागरिकांच्या तपासणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोलेस्ट्रोलमध्ये अल्प घनता आणि उच्च घनता लिपो प्रोटिन असतात. त्यामध्ये अल्प घनता असलेले शरीरासाठी घातक असतात, तर उच्च घनता असेलेले लिपो प्रोटीन शरीराला आवश्यक असतात. मात्र, मुंबईतील ५० टक्के नागरिकांमध्ये एचडीएलचे प्रमाण वाढले आहे. हे शरीरासाठी घातक असते. त्याचप्रमाणे ६० टक्के नागरिकांमध्ये एचडीएलचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले असून याचे प्रमाण कमी होणे देखील तितकेच घातक आहे.

- Advertisement -

हे आहे आवश्यक

  • कोलेस्ट्रॉल

    कोलेस्ट्रॉलची आवश्यकता २००
    उच्च सीमारेषा २०० ते २३९
    उच्च – २४०

  • एलडीएल

    एलडीएल आवश्यकता १००
    उच्च सीमारेषा १०० ते १२९
    उच्च – १६०
  • एचडीएल

    एचडीएल आवश्यकता ६० पेक्षा कमी
    मध्यम धोका ४० – ६०
    उच्च – ६० पेक्षा कमी


    हेही वाचा – कोळंबी खाताय? मग डाग तपासून पहा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -