घरCORONA UPDATECoronaVirus: मुंबईत गेल्या २४ तासात ५२ नवे रुग्ण, आकडा ३३०वर!

CoronaVirus: मुंबईत गेल्या २४ तासात ५२ नवे रुग्ण, आकडा ३३०वर!

Subscribe

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार जणांचा मृत्यू असून मृतांचा एकूण आकडा २२ झाला आहे. झाला आहे. तसंच दिलास देणारीबाब म्हणजे १४ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील आता कोरोनाग्रस्तांची संख्या ३३०वर पोहोचली आहे. सध्या मुंबईतील परिस्थितीती चिंताजनक होताना दिसत आहे. आज मुंबईत एकूण १९९ जणांची कोरोनाची चाचणी तपासणी करण्यात आली. तसंच ९६ जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णायत भर्ती करण्यात आले.

कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटीलेटर, अडीच लाख एन ९५ मास्क उपलब्ध असल्याचे आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे संवाद सांगितले.

- Advertisement -

राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत सोशल डिस्टंसिंग राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

हेही वाचा – अत्यावश्यक सेवेतील गैरहजर राहणाऱ्या कामागारांना निलंबित करण्याचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -