निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण सोडत

या ओबीसी आरक्षण सोडतबाबतची तारीख आणि वेळ याबाबतचा कार्यक्रम निवडणूक आयोग मुंबई महापालिका निवडणूक विभागाला कळविणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

मुंबई: सध्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत अशातच सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकीत ‘ओबीसी'(bmc) आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार जर निवडणूक आयोगाने पुढील दोन आठवड्यात फक्त ‘ओबीसी’साठी ६४ प्रभाग आरक्षण सोडत घेण्याचे आदेश दिले तर त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. जर निवडणूक आयोगाने संपूर्ण आरक्षण सोडत पुन्हा घेण्याचे आदेश दिल्यास त्याप्रमाणें त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापूर्वी ६१ प्रभाग आरक्षित केले जायचे. आता त्यात आणखीन ३ प्रभागांची भर पडणार आहे. मात्र या ओबीसी आरक्षण सोडतबाबतची तारीख आणि वेळ याबाबतचा कार्यक्रम निवडणूक आयोग मुंबई महापालिका निवडणूक विभागाला कळविणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

हे ही वाचा –  bmc election : ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा लॉटरी?, महापालिका आयुक्तांकडून आढावा बैठक

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी(obc0 आरक्षण वगळून ३१ मे रोजी २३६ प्रभागांमधून महिलांसाठी ११८ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी -१५ ( महिलांसाठी -८), अनुसूचित जमातीसाठी -२ महिलांसाठी -१) आरक्षण सोडत घेण्यात आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आगामी दिन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम अंतर्गत ‘ओबीसी’च्या ६४ प्रभागांसाठी आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी निम्मे म्हणजे ५० टक्के प्रभाग असतील. मात्र जर आयोगाने संपूर्ण आरक्षण सोडत पुन्हा घेण्याचे आदेश दिल्यास त्याप्रमाणें त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीची प्रतिक्षा सर्वच राजकीय पक्षांना व इच्छूक उमेदवारांना लागून राहिली आहे. यासंदर्भातील माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. या ओबीसी आरक्षण सोडतीचा इच्छुक उमेदवारांना लाभ होणार आहे. तर ज्यांना मागील आरक्षण सोडतीत महिला आरक्षणाचा फटका बसला त्यांना पुन्हा एकदा रूपाने संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा! गणेश मूर्तींवरील उंचीची मर्यादा हटवली

मुंबई महापालिकेची निवडणूक वास्तविक गेल्या मार्चपर्यन्त होणे अपेक्षित होती. मात्र ओबीसी आरक्षण, पावसाळा यांमुळे निवडणूक पुढे सरकली. आत पावसाळ्यानंतर निवडणूक होणार आहे. मात्र त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये विशेषतः सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात मोठी चढाओढ लागली आहे. या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडाचा झेंडा आमदारांनी फडकवला. त्यामुळेच राज्यात सत्तांतर झाले. भाजप व बंडखोर शिवसेना गट यांनी सरकार स्थापन केले. उप मुख्यमंत्री पदी माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यावर काहीच दिवसात ‘ओबीसी’ समाजाला राजकीय आरक्षणाचा लाभ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविल्याने निवडणूक प्रक्रियेत आता मोठा बदल झाला आहे. ओबीसी समाजाला मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांमधून ६४ प्रभाग आरक्षित करून मिळणार आहेत. मात्र निवडणूक आयोगाने जर आदेश दिले तर त्यानुसार फक्त ‘ओबीसी’साठी(obc) ६४ प्रभाग आरक्षित करून त्यापैकी फक्त महिलांचे प्रभाग निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

हे ही वाचा –  BMC Election 2022 : प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये ‘कही खुशी कही गम’, दिग्गज…

मात्र जर आयोगाने अनुसूचित जाती, जमाती, महिलांसाठी संपूर्ण आरक्षण सोडत पुन्हा घेण्याचे आदेश दिल्यास त्यानुसार पालिका निवडणूक विभाग कार्यवाही करणार आहे. जर संपूर्ण निवडणूक आरक्षण सोडत झाल्यास अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग तसेच ठेवून त्यामधून ८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यासाठी सोडत काढण्यात येईल. तसेच, अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग तसेच राहतील मात्र त्यामधून १ प्रभाग महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल. तसेच, उर्वरीत प्रभागांमधून महिलांसाठी ५० टक्के प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर उर्वरीत प्रभागामधून ‘ओबीसी’साठी ६४ प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित प्रभाग हे खुले प्रभाग असतील.