घरताज्या घडामोडीसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा! गणेश मूर्तींवरील उंचीची मर्यादा हटवली

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा! गणेश मूर्तींवरील उंचीची मर्यादा हटवली

Subscribe

यंदाचा गणेसोत्सव अत्यंत धुमधडाक्यात होणार असून उत्सवावरील  सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गणेश मूर्तींच्या उंचीवर असलेली मर्यादाही मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना हा अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. आज गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी दिली. (Removed height limit on Ganesha idols)

हेही वाचा मोठी बातमी! दहीहंडी, गणेशोत्सव आता निर्बंधमुक्त, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

- Advertisement -

गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, गणपती मूर्तींवरील उंचीची मर्यादा हटवण्यात आली आहे. तसेच, बाप्पाच्या आमगन-विसर्जन मार्गावरील खड्डे भरण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

एक खिडकी योजना

मंडपाच्या परवानग्या मिळण्यासाठी सुटसुटीत यंत्रणा राबण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी एक खिडकी योजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, मंडपांना परवानगी देताना क्लिष्ट अटी-शर्थी न ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय, मंडळांकडून कोणतेही नोंदणी शुल्क न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

प्रकाशव्यवस्था

विर्सजन घाटावर आणि मार्गावर विशेष प्रकाशव्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, याआधी ध्वनीप्रदुषणाबाबत जे गुन्हे दाखल झाले होते त्याचा तपास करून प्रकरणी मार्गी लावण्यात येणार आहे.

मूर्तीकारांनी मुर्ती घडवण्यासाठी जागेची मागणी केली होती. अशा जागांचा शोध घेऊन त्यांना लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

तसेच, गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांना टोलमाफी करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -