घरमुंबईपार्टीला गेलेल्या प्रियाचा अपघाती मृत्यू; वेस्टर्न एस्क्स्प्रेस हायवेवर अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा अंदाज

पार्टीला गेलेल्या प्रियाचा अपघाती मृत्यू; वेस्टर्न एस्क्स्प्रेस हायवेवर अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा अंदाज

Subscribe

मुंबई : मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये (Call Center) काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा वेस्टर्न एस्क्स्प्रेस हायवेवर अपघातात मृत्यू झाल्याची माहीत समोर येत आहे. प्रिया कनोजिया (Priya Kanojia) असे या तरुणीचे नाव असून गेल्या आठवड्यात रविवावरी पार्टीवरून पहाटे घरी जात असताना तिचा अपघातात मृत्यू झाला.

प्रिया कनोजिया ८ एप्रिलला (शनिवारी) रात्री ९ वाजात ऑफिसच्या पार्टीला जाते, असे आईला सांगून घरातून बाहेर पडली. रविवारी पहाटे पार्टीवरून घरी जात असताना वेस्टर्न एस्क्स्प्रेस हायवेवर दहिसरच्या आसपास तिच्या स्कुटीचा अपघात झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या स्कुटीवर पाठीमागे बसलेल्या ऑफिसमधील मैत्रीण जखमी झाली आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत प्रियाच्या मैत्रिणीने अद्याप पोलिसांना माहिती दिलेली नाही. मात्र, प्रियाच्या स्कुटीला रस्त्यावरुन जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात हिट अँड रनचा तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

प्रिया कनोजिया तिचे आई-वडील आणि भावासोबत बोरिवलीमध्ये राहत होती. प्रियाचे वडील हे रिक्षा चालवतात, तर तिचा भाऊ बीपीओमध्ये नोकरीला आहे. प्रियाने रात्री 9 वा. पार्टीला गेल्यामुळे तिला घरी यायला उशीर होईल, असे कुटुंबीयांनी गृहित धरले होते. मात्र रविवारी सकाळी प्रियाची मैत्रीणीने तिच्या आईला फोन केला. त्यावेळी प्रियाचा दहिसरमध्ये अपघात झाल्याचे समजले. यानंतर विभा आणि तिचा नवरा विजय हे दोघे अपघात झाला त्याठिकाणी जाण्यासाठी निघाले. रस्त्यामध्ये त्यांना प्रियासोबत असलेल्या मैत्रिणीने पुन्हा फोन केला आणि प्रियाला कांदिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. विभा आणि तिचा नवरा सकाळी साडेनऊच्या सुमारास रुग्णालयात पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी प्रिया कनोजियाचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

अपघातावेळी प्रियासोबतची मैत्रीण अजूनही बेशुद्ध असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांना हा अपघात कसा झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हे प्रकरण हिट अँड रनचे असावे, असा अंदाज लावून पोलिसांनी कलम ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मात्र, ज्याठिकाणी अपघात झाला त्या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि अपघातस्थळी साक्षीदारही नसल्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -