घरमुंबईनोटाबंदीच्या निर्णयाप्रमाणे 2 हजारांच्या नोटांचा निर्णयही बालिश - पृथ्वीराज चव्हाण

नोटाबंदीच्या निर्णयाप्रमाणे 2 हजारांच्या नोटांचा निर्णयही बालिश – पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

मुंबई : केंद्र सरकराने 2 हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी (19 मे) घेतला. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील प्रतिक्रिया देताना म्हटले की, नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिश आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,  जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा केंद्र सरकारची 3 उद्दिष्ट होती. पहिलं म्हणजे दहशतवाद बंद होईल, भ्रष्टाचार बंद होईल आणि काळा पैसा नष्ट होईल. पण यातील एकही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. मागील नोटबंदीच्या निर्णयामुळे नरेंद्र मोदी (Narednra Modi) स्वत: तोंडघशी पडले आहेत. नोटबंदी झाल्यानंतर लोकांनी बँकांबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आणि त्यात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. नोटबंदीमुळे भारतातील कमीत कमी 120 कोटी लोक प्रभावित झाले आहेत आणि सरकारच्या एका निर्णयामुळे  इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास झाल्याचे दुसरे उदाहरण माझ्यासमोर नाही, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

प्रत्येक वयातील लोक नोटाबंदीच्या लाईनमध्ये
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नोटाबंदी झाल्यानंतर 10 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या वृद्धांपर्यंत लोक नोटा बदलण्यासाठी लाईनमध्ये उभे राहीलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. कुणाला औषध, कुणाला शाळेची पुस्तकं, कुणाला दूध-भाजीपाला घ्यायचा होता, पण नोटाबंदीमुळे त्यांना घेता आले नाही.

2 हजार रुपयांच्या नोटांवर बंदी
नोव्हेंबर 2016मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नोटाबंदीनुसार 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट चलनात आणली. 2016-17 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2 हजार रुपयांची एकही नोट छापलेली नाही. यानंतर आता आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणली असून त्या नोटा बँकांमध्ये बदलून घेण्याचे आवाहन केले आहे. या नोटा बदलण्याची प्रक्रिया येत्या 23 मेपासून सुरू होणार आहे. नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत एकावेळी फक्त 20 हजार रुपयांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तथापि, यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -