घरक्राइम७ वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातील सावत्र बापाची निर्दोष मुक्तता

७ वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातील सावत्र बापाची निर्दोष मुक्तता

Subscribe

तब्बल ७ वर्षे आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याच्या खोटया गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये असलेल्या विपुल प्रभाकर नारकर या तरुणाची कल्याणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. हरणे ह्यांनी गुन्ह्याशी त्यांचा कोणताही सबंधच नसल्याचे निर्कष नोंदवित रामनगर पोलीस स्टेशनच्या तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत निर्दोष मुक्तता केली. नारकरांची बाजु न्यायालयापुढे अधिवक्ता गणेश घोलप ह्यांनी मांडली.

मुंबईत स्वत:ची प्रिंटींग प्रेस चालविणाऱ्या २८ वर्षीय विपुल नारकरांची काळाचौकी येथे खानावळ चालविणाऱ्या ३४ वर्षीय घटस्फ़ोटीत महीलेशी तिच्या भावाच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. महीलेचा २०११ मध्ये घटस्फ़ोट होऊन तिला १५ वर्षीय मुलगी व १८ वर्षीय मुलगा होता. अविवाहित विपुल नारकरने तिचा मुला-बाळासह स्विकार केला होता, स्वत:च्या कमाईने ४ लाखांमध्ये पागडी पध्दतीने आयरे गावामध्ये घर खरेदी करुन मुलांचे शिक्षण प्रवेश डोंबिवलीतील नामांकीत शाळेत करुन दिलेला होता. ६ मे २०१५ रोजी १५ वर्षीय मुलीने आपले सावत्र वडील विपुल नारकर ह्यांचे विरोधात ते १ वर्षापासुन २६/०४/२०१५ पर्यत सातत्याने रहात्या घरात बलात्कार करत असल्याबाबतची फ़िर्याद नोंदविल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

सरकार पक्षातर्फ़े पिडीता, तिचा भाऊ, प्रियकर, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले होते. पिडीता आपल्या आणखीन दुसऱ्या प्रियकराला व आईसोबत घटस्फ़ोट घेतलेल्या पुर्वीच्या वडीलांसोबत कोर्टात साक्ष देण्यासाठी आली होती. शिवाय ती व तिचे आई, वडील एकत्र रहात असल्याचे सांगताना सावधान इंडीया सिरियल बघुन आई, वडील व मी नारकरांना गोवल्याचे उलट तपासात सांगताना बलात्कार झाल्याच्या अनुंषगाने नव्हे तर फ़िनेल पिण्यामुळे प्राथमिक उपचार करण्यासाठी बाह्यरुग्ण म्हणुन तिच्यावर उपचार करण्यात आलेला होता. तिच्यावर बलात्कार झाल्याबाबत कोणताही अहवालच नव्हता, शिवाय आम्ही ते घरदेखील विकले असल्याची कबुली त्यांनी दिली होती. आपल्या प्रियकरासोबत फिरते म्हणुन मोबाईलवर अश्लिल क्लिप दाखवत जीवे मारण्याची धमकी देत रहात्या घरात बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तपास महीला पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला नियुक्तीला असतानाही प्रोबेशन पिरीयडवर असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन मदगुण यांनी गुन्ह्याचा तपास तसेच पुरुष डाक्टरांनी तिची तपासणी केली होती.

गुन्ह्याचा तपास हा सुरवातीला फ़िर्याद देण्यापासुन ते चार्जशिट, तसेच उलट तपासातील कथने यामध्ये प्रचंड विरोधाभास दिसुन आला, तपास यंत्रणेबाबत प्रचंड संशय निर्माण होईल अशा बाबी अॅड. गणेश घोलप, स्वप्नील चौधरी व मोनिका गायकवाड यांनी समोर आणल्यावर न्यायालयाने तपास यंत्रणेबाबत विशेष नोंदी घेऊन न्यायालयाने विपुल नारकरला निर्दोष मुक्त केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -