पाठीत वार कुणी केला? राऊत-राणे यांच्यात ट्विटर वॉर

माझ्याच माणसांनी धोका दिला म्हणत उद्धव ठाकरे काल राजीनामा देताना भावूक झाले होते. दरम्यान, अनेक शिवसैनिक यामुळे दुखावले असून संजय राऊत यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ट्विट केलंय.

sanjay raut and nitesh rane11

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी विसर्जित करावी लागली. अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. माझ्याच माणसांनी धोका दिला म्हणत उद्धव ठाकरे काल राजीनामा देताना भावूक झाले होते. दरम्यान, अनेक शिवसैनिक यामुळे दुखावले असून संजय राऊत यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ट्विट केलंय. (Tweeter war between sanjay raut and narayan rane)

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, ३१ महिन्यांत आघाडी सरकार कोसळले

पाठीवर वार असलेले हे चित्र असून नेमकं हेच घडलं असं कॅप्शन राऊतांनी दिलंय. म्हणजेच, आपल्याच पक्षातील लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर वार केले आहेत, असं अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून म्हणायचं आहे.

हेही वाचा – मंत्रिपदाच्या याद्या सोशल मीडियावर व्हायरल, एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले…

दरम्यान, संजय राऊत यांनी हे ट्विट करताच भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटला कॉमेंट केली आहे. २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपला होता त्यामुळे कर्मा रिटर्न्स म्हणत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.


या दोघांच्या ट्विटमुळे नक्की कोणी कोणाच्या पाठी वार केले? याविषयी चर्चा रंगल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या विश्वासदर्शक ठरावाला हिरवा कंदील दाखवला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला. बहुमत चाचणीचा खेळ खेळायचा नाही असे स्पष्ट करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ही घोषणा करताना ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सूनवताना राज्यपालांचे नाव न घेता त्यांना टोले लगावले..मी आता शिवसेना भवनात बसणार आहे.एका नवीन शिवसेनेची उभारणी परत नव्या जोमाने करणार असल्‍याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. राजीनाम्याची घोषणा करताना उद्धव ठाकरे हे भावनिक झाले होते.