घरCORONA UPDATEसोनू सूदने मदत केलेले अनेक ट्वीटर अकाऊंट्स डिलीट! नक्की काय आहे झोल?

सोनू सूदने मदत केलेले अनेक ट्वीटर अकाऊंट्स डिलीट! नक्की काय आहे झोल?

Subscribe

कोरोनाचं संकट एकीकडे राज्यात आणि देशात कामय चर्चेत असताना दुसरी चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे अभिनेता सोनू सूद अडकलेल्या मजूरांना करत असलेली मदत. हजारो मजूरांना महाराष्ट्रातून त्यांच्या गावी पाठवण्याचं काम सोनू सूद कोरोनाचं संकट ओढवल्यापासून करत आहे. त्याचा सर्व खर्च सोनू सूद स्वत: करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याला काही प्रमाणात खासगी मदतनिधी देखील उपलब्ध झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, एकीकडे सोशल मीडियापासून समाजातल्या सर्वच स्तरांमधून सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे एक अजब गोष्ट घडली आहे. यामुळे खुद्द सोनू सूद देखील आश्चर्यचकित झाला असून त्याच्या प्रयत्नांनाच व्यर्थ ठरवणारी ही बाब ठरू शकते अशी भिती त्यानं ट्वीटरवर व्यक्त केली आहे!

ट्वीटर अकाऊंट अचानक डिलीट!

सोनू सूदने ज्या ज्या लोकांना मदत केली आहे, त्यांच्या घरी पोहोचवलं आहे, त्यांनी ट्वीटरवर त्याला धन्यवाद देत आभार मानले आहेत. त्यावर सोनू सूदने देखील त्यांना प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आता अचानक यातले काही अकाऊंट डिलीट झाले आहेत. त्याचे स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

- Advertisement -

sonu sood tweet 1

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच सोनू सूदवर खोचक टीका करणारं ट्वीट केलं होतं. तसेच, सोनू सूदच्या या सगळ्या मदतनाट्याच्या पाठीमागे भाजप असल्याची देखील टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोनू सूदने ट्वीट करून अशा फेक ट्वीटर अकाऊंट्सबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘माझी विनंती आहे की फक्त रास्त आणि खरंच ज्यांना गरज आहे अशांनीच मदतीसाठी मेसेज पाठवावेत. काही लोकांनी ट्वीट करून पुन्हा अकाऊंट डिलीट केले आहेत. त्यामुळे हे अकाऊंट बनावट असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यामुळे आमच्या प्रयत्नांनाच धक्का बसणार असून ज्यांना खरच गरज आहे, त्यांचं नुकसान होईल’, असं सोनू सूद आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.

- Advertisement -

काही ट्वीट्स तर काही अकाऊंट्स डिलीट झाले असले, तरी अजूनही मोठ्या संख्येने अकाऊंट्स आणि ट्वीट्स सोनूच्या अकाऊंटवर असून त्यामध्ये सगळ्यांनीच सोनूचे मनापासून आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -