घरमुंबईतर ताईंना आणि साहेबांना सांगतो निवडणूक लढू नका - अजित पवार

तर ताईंना आणि साहेबांना सांगतो निवडणूक लढू नका – अजित पवार

Subscribe

भाजपाने तिकीट दिले तर माढा किंवा बारामीतून पवारांच्या विरोधात लढेन असे महादेव जानकर यांनी सांगितले होते. त्याची अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढा मतदार संघातून तर त्यांची कन्या सुप्रिया सुळे बारातमी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र जर भाजपाने तिकीट दिले तर माढा किंवा बारामतीतून पवारांच्या विरोधात लढेन असे छातीठोकपणे राज्याचे दुग्ध विकास मंत्री आणि रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. मात्र जानकर यांच्या या वक्तव्याची राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. जर एवढा मोठा नेता साहेबांविरोधात आणि ताईंविरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक असेल तर मी आजच ताईंना आणि पवार साहेबांना तुम्ही निवडणूक लढू नका असे सांगतो, असं म्हणत अजितदादांनी जानकरांना टोला लगावला. आपलं महानगरच्या प्रतिनिधीने जानकर हे बारामती किंवा माढ्यातून पवार साहेबांविरोधात निवडणूक लढाण्यास तयार असल्याची इच्छा व्यक्त केल्याचे अजित पवार यांना विचारले असताना अजितदादांनी जाणकारांची थेट खिल्ली उडवली.

नेमकं म्हणाले अजित पवार

जर जानकर यांच्यासारखा मात्तबर नेता पवारसाहेब आणि ताईंसमोर निवडणुकीत उभा राहत असेल तर मी ताईंना आणि पवार साहेबांना आजच सांगेन की तुम्ही निवडणूक लढू नका, अशी कोपरखळी अजित पवार यांनी लगावली.

- Advertisement -

काय म्हणाले होते जानकर

भाजपने जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल’, असं म्हणत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट पवारांना आव्हान दिलं होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर पवारांना थेट जानकरांनी आव्हान दिले होते. तसेच ‘मी बारामती आणि माढा येथे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे,’ असेही महादेव जानकरांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -