घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 मुख्यमंत्र्यांनी 'त्या' वक्तव्याचा खुलासा करावा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा करावा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

Subscribe

आता नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी दिलेलं हे उत्तर विरोधकांना चांगलंच झोंबल्याचं दिसतंय.

राज्यात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्तांतरानंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली. आजच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची पुरेपुर तयारी केली होती. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी ठरल्याप्रमाणे बहिष्कार घातला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले. मुख्यमंत्र्यांच्या चहापाण्याला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना सुनावले.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे सत्ता गेल्यामुळे पाण्याविना मासा तडफडतो तसे तडफडत आहेत. मला महाराष्ट्रद्रोही म्हणणारे अजित पवार हे दाऊदशी संबंध असल्याने तुरुंगात गेलेल्या आपल्या मंत्र्याचा राजीनामादेखील घेऊ शकले नाहीत. हा त्यांचा एक प्रकारचा देशद्रोहच आहे. त्यामुळे ते माझ्या चहापानाला आले नाहीत तेच बरे झाले. त्यांच्यासोबत चहा-पाणी घेतले असते, तर माझाही देशद्रोह ठरला असता. ते न आल्याने माझा देशद्रोह टळला आहे, असं सणसणीत उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिलं.

- Advertisement -

त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी दिलेलं हे उत्तर विरोधकांना चांगलंच झोंबल्याचं दिसतंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. विरोधकांवर टीका करताना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले. विरोधी पक्षाचा कोणता सदस्य देशद्रोही आहे ? कोणता देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला आहे? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला.

- Advertisement -

विधान परिषदेतील कोणत्या सदस्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे? याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी आज सभापती यांच्याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

- Advertisment -