घरट्रेंडिंगअमित ठाकरेंच्या राजकीय भवितव्यासाठी पत्नी मिताली ठाकरे 'लकी'

अमित ठाकरेंच्या राजकीय भवितव्यासाठी पत्नी मिताली ठाकरे ‘लकी’

Subscribe

राज ठाकरे यांच्यासारखा करिष्मा अमित ठाकरे यांच्याकडे नाही. तरिही परिश्रम आणि विनम्रतेच्या जोरावर अमित ठाकरे पुढे जातील, असे त्यांचे ग्रहमान सांगते.

‘राज’पुत्र अमित ठाकरे हे आता सक्रीय राजकारणात उतरले आहेत. मनसेच्या महाअधिवेशनात त्यांचे राजकीय लॉचिंग झाले. शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे आमदार बनून विधानसभेत गेले आणि कॅबिनेट मंत्रीही झाले. त्यानंतर आता दुसरे ठाकरे राजकारणात आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र अमित ठाकरे राजकारणात यशस्वी होणार की अपयशी? त्यांचे नेतृत्व मनसे पक्ष आणि पर्यायाने महाराष्ट्र स्वीकारणार का? काय लिहलंय अमित ठाकरेच्या राजकीय कुंडलित, त्यांचे ग्रह-तारे काय सांगतात? याबद्दल आम्ही प्रसिद्ध ज्योतिष पंडित राजकुमार शर्मा यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितले की पुढची दहा वर्ष ही अमित ठाकरेंची असणार आहेत.

अमित ठाकरे यांची जन्मदिनांक २४ मे १९९२ असून त्यांचा जन्म रविवारी झाला होता. कुंभ राशीत जन्मलेले अमित ठाकरे यांचा शनी सध्या स्वगृही आहे. २४ जानेवारी पासून कुंभ राशीची साडेसाती सुरु होत आहे. मात्र शनी स्वगृही असल्यामुळे अमित ठाकरे यांच्या कुंडलीत शश योग आणि राज योग निर्माण होत आहे. १५ मे २०२० पासून अमित यांची शनीची महादिशा सुरु होणार आहे. २०३९ पर्यंत ही दशा राहणार आहे. त्यामुळे १९ वर्ष अमितला मागे वळून बघावे लागणार नाही. ते मनसेला एक नवी दिशा देतील. मनसेचे युवा कार्यकर्ते अमित यांना नेता म्हणून स्वीकारतील, असे पंडित राजकुमार शर्मा यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

तर दुसऱ्या बाजुला राज ठाकरेंचा शनी प्रतिकूल घरात आहे. राज ठाकरेंची राशी मकर आहे. त्यांचा शनी उत्तम नसल्यामुळे मागचे १० वर्ष त्यांच्यासाठी कठिण काळ होता. आता त्यांचा शनी बदलला असून त्यांचे नवे पर्व सुरु होणार आहे. राज यांनी बदललेला झेंड्याचा रंग त्यावरची राजमुद्रा, भाजपच्या नेत्यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात आणि अपयशानंतरही मनसेच्या नेत्यांभोवती असलेले कार्यकर्त्यांचे मोहोळ हे बदललेल्या शनीची चाहूल आहे. पुढच्या वर्षीपर्यंत राज ठाकरेच्या छत्रछायेखाली अमित असेल. पण त्यानंतर अमित स्वतःची अशी शैली निर्माण करेल, जी राज्याला देखील आवडेल, असेही पंडीतजींनी सांगितले.

राज ठाकरेंचा करिष्मा म्हणजे त्यांची वाणी होती, या वाणीच्या जोरावरच त्यांनी लाखोंच्या सभा गाजवल्या. अमित ठाकरेंचा करिष्मा म्हणजे त्यांचे कठोर परिश्रम आणि विनम्रता असेल. अमित हे जरी मितभाषी वाटत असले तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्यांनी फक्त आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. अमित आपल्या वडिलांच्या तुलनेत अबोल आणि मृदू भाषी वाटतात. या मुद्द्यावर पंडीत राजकुमार यांनी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिले. ‘इंदिरा गांधींना सुरुवातील लोक गुंगी गुडिया बोलत होते. पण जेव्हा त्यांची शनीची महादिशा लागली तेव्हा त्या जगातील श्रेष्ठ नेत्या झाल्या. देशाचे राजकारण त्यांच्याभोवती केंद्रीत झाले. त्यामुळे कुंडलीतला शनीचा करीष्मा हा नेहमची महत्त्वाचा ठरत असतो. अमित यांच्यासाठी तशाचप्रकारची भविष्यवाणी पंडीत शर्मा यांनी केली.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, शनीची महादशा लागते. तेव्हा माणूस रंकाचा राजा होतो आणि शनी जेव्हा अनुकूल नसतो तेव्हा १३ आमदारांची संख्या एका आमदारावर येऊ शकते. सचिन तेंडुलकरचा शनी चांगला असल्यामुळे तो १७ व्या वर्षी जगप्रसिद्ध झाला. तर अमरीश पुरी यांना पहिला हिट मिळण्यासाठी ४७ व्या वर्षांपर्यंत वाट पहावी लागली.

पत्नी मिताली ठाकरे ठरणार लकी

अमित ठाकरे यांची पत्नी मितालीच्या कुंडलीचा अमितच्या कारकिर्दीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे पंडितजींनी सांगितले. अमितसाठी ती भाग्य घेऊन आली आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद प्रत्येक मुलावर असतोच. मात्र जीवनसाथी म्हणून असलेल्या स्त्रीच्या ग्रहताऱ्यांचा मोठा परिणाम राजकीयच नव्हे तर प्रसिद्धी क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींवर प्रकर्षाने जाणवत असतो, अशी भविष्यवाणी करणाऱ्या पंडीत राजकुमार शर्मा यांनी २०१४ साली कोणताही संकेत नसताना नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी केली होती आणि ती तंतोतंत खरी ठरल्यानंतर पंडीत राजकुमार शर्मा राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात प्रकाशझोतात आले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -