घरमुंबईकोरोना काळात महापालिकेच्या अतुलनीय कामांपुढे मी नतमस्तक - अमिताभ बच्चन

कोरोना काळात महापालिकेच्या अतुलनीय कामांपुढे मी नतमस्तक – अमिताभ बच्चन

Subscribe

माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींच्या 'मुंबई फाइट्स बॅक' या पुस्तकाचे लोकार्पण, मुंबई महापालिकेने कोरोना विरोधात दिलेला लढा यशस्वी

मुंबई-: “बढ़ती हैं लपटें भयकारी ; अगणित अग्नि-सर्प-सी बन-बन। गरुड़ व्यूह से धँसकर इनमें, इनका कर स्वीकार निमंत्रण । देख व्यर्थ मत जाने पाये, विगत युगों की शीक्षा-दीक्षा। यह मानव की अग्नि-परीक्षा।” या कविश्रेष्ठ हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेतील ओळी उद्धृत करत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोविड काळासारख्या अग्निपरीक्षेच्या दरम्यान मुंबई महापालिकेने केलेल्या अथक, अविरत आणि अतुलनीय कामांपुढे आपण नतमस्तक आहोत, असे नम्रनिवेदन प्रसिध्द फिल्मस्टार बिग बी अमितभ बच्चन यांनी केले आहे.

आपण स्वतः दोन वेळा कोरोनाने बाधित झालो होतो. मात्र चांगल्या उपचारामुळे त्या आजारातून बाहेरही पडलो, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. तसेच, मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या शहरात कोरोना विषाणूचा मुकाबला करणे, हे अत्यंत मोठे आव्हान होते. तथापि, मुंबई महापालिकेने दिवस – रात्र एक करून केलेल्या कामांमुळे मुंबईचा कोविड विरोधातील लढा हा यशस्वी झाला, असे गौरवोद्गारही अमिताभ बच्चन यांनी काढले आहेत.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पालिका आरोग्य यंत्रणेचा वापर करून कोरोना विरोधात यशस्वी लढा देत कोरोनावर नियंत्रण मिळविले. कोरोना विरोधात त्यांनी दिलेल्या लढ्यातील अनुभवांवर आधारित ‘मुंबई फाइट्स बॅक’ हे पुस्तक केवळ आरोग्यदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिक दृष्ट्या देखील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, असेही अमिताभ बच्चन यांनी आवर्जून नमूद केले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या पुस्तकाचे बुधवारी मुंबईतील मलबार हिल येथील कमला नेहरू गार्डन व फिरोजशहा मेहता गार्डन (हँगिंग गार्डन) जवळील ‘महापालिका बंगला’ येथे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वरीलप्रमाणे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी पुस्तकाच्या सहलेखिका सुमित्रा डेबराय आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत असताना सुरेश काकाणी यांच्याकडे आरोग्य आणि वैद्यकीय विषयक विविध विभागांची जबाबदारी होती. याच कालावधी दरम्यान मुंबईमध्ये कोरोना या साथरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. या रोगाविरोधातील लढाईचे अतिशय साध्या सोप्या व ओघवत्या भाषेतील सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.

पुस्तकात कोरोनाचा मुकाबला करण्याचा कानमंत्र -: सुरेश काकाणी

- Advertisement -

या पुस्तकाबाबत अधिक माहिती देताना माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोविड या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी ‘टीम बिल्डिंग’ वर लक्ष केंद्रित करून त्याचवेळी वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि विविध स्तरीय उपाययोजनांची परिपूर्ण अंमलबजावणी कशी करण्यात आली, याचा सुव्यवस्थित उहापोह व कानमंत्र या पुस्तकात आहे. त्याचबरोबर कोविड विरोधातील लढा लढत असताना आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी राबविलेल्या बाबी यांचीही सांगोपांग माहिती या पुस्तकात आहे. या पुस्तकाच्या सहलेखिका व जेष्ठ पत्रकार श्रीमती सुमित्रा डेबराॅय यांनी, भविष्यात साथ रोग विषयक व्यवस्थापन करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याची रूपरेषा या पुस्तकात दिली असल्याचे सांगितले.


22 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणी एबीजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ऋषी अग्रवाल यांना अटक, सीबीआयची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -