घरमुंबईअंगणवाडी सेविका आझाद मैदानावर पुन्हा धडकणार

अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर पुन्हा धडकणार

Subscribe

राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ६ हजार ५५० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तातडीनं भरण्यात याव्यात, असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. याबाबतही सरकार टाळाटाळ करत आहे.

केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आधीच वाढ केली आहे. पण, राज्य सरकारकडून अजूनही ही वाढ झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका मंगळवारी म्हणजेच ११ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात महामोर्चा काढणार आहेत. मानधनवाढीबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेची आणि राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अद्यापही अंमलबजावणी न झाल्यामुळे अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा आझाद मैदानावर धडकणार आहेत.

आझाद मैदान ते मंत्रालयापर्यंत मोर्चा

आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आंदोलन करणार आहेत. केंद्र शासनाकडून सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५०० रुपयांनी वाढ करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. ही वाढ महिनाभरात लागू होईल, असंही सांगण्यात आलं होतं. पण, अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’ने मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदान ते मंत्रालय असा हा मोर्चा निघणार आहे. साधारणतः दहा हजार अंगणवाडी कर्मचारी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

याविषयी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितलं की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली होती. अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये तर मदतनीसांचं मानधन ७५० रुपये वाढवण्यात आलं होतं. केंद्राच्या निर्णयानंतरही राज्य सरकारने ही वाढ केलेली नाही. त्यासोबतच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा सेवानिवृत्त लाभ हा १ लाख आहे. त्यात ही वाढ करावी अशी ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. “

महाराष्ट्रात ६ हजार ५५० रिक्त पदे

महाराष्ट्रात ९७ हजार अंगणवाडी आहेत. त्यासोबत ग्रामीण अंगणवाडी केंद्रांना एक हजार रुपये, नागरी अंगणवाडी केंद्रांना चार हजार आणि मुंबईतील अंगणवाडी केंद्रांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये भाडे देण्यात यावे, अशी अधिसूचना राज्य सरकारद्वारे काढण्यात आली होती. पण, अजूनही त्याची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यासोबतच राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ६ हजार ५५० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तातडीनं भरण्यात याव्यात, असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. याबाबतही सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे, ही सरकारची अनास्था असल्याचं ही एम.ए.पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

बालकांना नित्कृष्ट दर्जाचा टीएचआर

बालकांना देण्यात येणारं अन्न म्हणजेच टीएचआर ही नित्कृष्ट दर्जाचा असतो. कोणीही खाऊ शकत नाही असा त्याचा दर्जा असतो. तरीही, तेच अन्न त्या बालकांना पुरवलं जातं. याविषयी ही अंगणवाडी सेविकांनी तक्रारी केल्या आहेत. पण, याकडेही कुणीच लक्ष देत नसल्याचा आरोप एम.ए.पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा – 

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -