घरमुंबईसर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात करीन, आजची चौकशी रिसॉर्टबाबत - अनिल परब

सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात करीन, आजची चौकशी रिसॉर्टबाबत – अनिल परब

Subscribe

ईडीने आज (गुरूवारी) सकाळी मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधीत 7 ठिकाणांवर छापे टाकले. यात शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील घराचा समावेश हात. ही कारवाई झाल्यानंतर अनिल परव यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी, घरावर आणि लोकांवर छापे घातले. दापोली येथील साई रेसॉर्ट प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात होईल, आजची चौकशी रिसॉर्ट संबंधीत होती, असे सांगितले

आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शासकीय निवासस्थान, मी राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार हे बोलले जात होते. यामागचा गुन्हा काय हे तपासले असता असे लक्षात आले की दापोली इथले साई रिसॉर्ट. जे मी सांगतोय की त्याचे मालक सदानंद कदम आहे. त्यांनी ते कागदपत्रांद्वारे सांगितले आहे. त्यांनी कोर्टातही तसा दावा केलाय. त्यांनी खर्चाचा हिशेबही दिलाय. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आयटीची रेड पडली आहे. हे रिसॉर्ट अजूनही सुरु झाले नाही. हे रिसॉर्ट पूर्ण झालेले नाही. असे असताना पर्यावरणाची दोन कलम लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जाते, त्याबाबत केंद्रीय पर्यावरण खात्याने गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात दाखल केला होता. हे रिसॉर्ट चालू नाही तरीही माझ्या नावाने, साई रिसॉर्टच्या नावे अशी नोटीस काढली गेली. एक तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीला प्रेडिगेटेड ऑफेन्स समजून आज ईडीने माझ्यावर कारवाई केली, असे अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

मी उत्तर देण्यास मी बांधील –

ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. मी पहिल्यापासून सांगतोय की ज्या यंत्रणा मला कुठलाही प्रश्न विचारतील त्याला उत्तर देण्यास मी बांधील आहे. पूर्वीही उत्तरे दिली होती. आजही दिली. पुढेही उत्तरे देण्याची माझी तयारी आहे. समुद्रात जर बंद रिसॉर्टचे सांडपाणी जात असेल तर त्यात मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा येतो कुठे. याचा खुलासा कोर्टात होईल. मी कायद्याला सामोरा जायला तयार आहे. कायद्यान्वये काय होऊ शकते, काय होऊ शकत नाही हे मला माहिती आहे, असंही परब यावेळी म्हणाले.

- Advertisement -

 कागपत्र ताब्यात घेतली –

काही कागदपत्र मी दिली ती त्यांनी घेतली आहेत. बाकी काही त्यांनी घेतले नाही. मला कळत नाही की ज्या लोकांवर छापे पडले त्यातील किती लोकांचा रिसॉर्टशी संबंध आहे, असेही परब यांनी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -