घरमुंबईउद्या कॅबिनेटमध्ये होणार घोषणांचा पाऊस; विरोधकांची चिंता वाढली

उद्या कॅबिनेटमध्ये होणार घोषणांचा पाऊस; विरोधकांची चिंता वाढली

Subscribe

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास ५० महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकार घोषणांचा पाऊस पाडत असल्याचे चित्र आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळच्या बैठकीत पुन्हा घोषणांचा पाऊस होणार आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. उद्या दुपारी ३ वाजाता सह्याद्रीवर ही बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास ५० महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकार घोषणांचा पाऊस पाडत असल्याचे चित्र आहे. ५ मार्चला जवळपास २२ निर्णय मंजूर झाल्यानंतर उद्या ५० निर्णय मंजूर करण्याचा सरकारचा हेतू आहे. विशेष म्हणजे या आठवड्यातील ही दुसरी आणि आचारसंहितेआधीची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक असेल.

विरोधक चिंतेत

एकीकडे राज्य सरकारच्या निर्णयाला गती आलेली असताना मात्र विरोधक चिंतेत असल्याचे पहायला मिळत आहे. आधीच एअर स्ट्राईकने धाबे दणाणलेले विरोधक राज्य सरकारच्या झपाट्याने होत असलेल्या निर्णयामुळे पेचात पडले आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारले असता काही दिवसांमध्ये निवडणुका जाहीर होत आहेत. त्यामुळे राज्य सरकार गतिमान झाले असून, ५ मार्चच्या कॅबिनेटमध्ये जवळपास २२ निर्णय घेतले आणि आता उद्या ५० निर्णय घेणार आहेत. त्यामुळे हे झोपलेले सरकार अचानक जागे झाले की काय असे वाटू लागल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisement -

आधीच्या बैठकीत २२ घोषणा

५ मार्चला झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीतही सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. या बैठकीत एकूण २२ निर्णय निकाली काढण्यात आले. यामध्ये सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचसोबत राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू, ठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पास मान्यता, राज्यातील २३ मातोश्री वृद्धाश्रमांना अनुदान, आपातकालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी कौशल्य केंद्रे स्थापणार, शासकीय वैद्यकीय, दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी यंत्रसामग्रीच्या खरेदीचे अधिकार विभागास, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापणार, माजी सैनिकाच्या पत्नीला मिळणार ५१ वर्षांनी जमीन, पुण्याच्या स्पाईसर युनिव्हर्सिटीवर कारवाईसाठी अध्यादेश, रेंटल हौसिंग योजनेंतर्गत अभिहस्तांतरणासाठी शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारणार, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एसपीव्ही स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -