घरट्रेंडिंगघोडचूक! शाळेच्या पुस्तकात मिल्खा सिंगच्या जागी फरहान अख्तर

घोडचूक! शाळेच्या पुस्तकात मिल्खा सिंगच्या जागी फरहान अख्तर

Subscribe

एखाद्या भूमिकेचा आणि ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा लोकांवर किती प्रभाव असतो, याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा बायोपिक जगभरात सुपरहिट ठरला. चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर याने साकरलेले मिल्खा सिंह लोकांना प्रचंड आवडले. जगभरातून फरहान अख्तरवर  त्याच्या या भूमिकेसाठी कौतुकाचा वर्षाव झाला. बरेचदा एखादा अभिनेता त्याला देण्यात आलेलं पात्र त्याच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर इतक्या दमादार पद्धतीने साकारतो, की मूळ व्यक्तिऐवजी तो अभिनेताच लोकांच्या जास्त लक्षात राहतो. प्रसंगी तो अभिनेता हाच ती मूळ व्यक्ती असल्याचं लोक मानायला लागतात. अभिनेता फरहान अख्तरच्या बाबतीतही काहीसं असच घडलं आहे. पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकात ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांच्या जागी चुकून फरहान अख्तरचा फोटो छापण्यात आला आहे. ही बाब समोर आल्यानंतर स्वत: फरहानने ट्वीवटरद्वारे याविषयी नाराजी जाहीर केली. इतकंच नाही तर ही खूप मोठी चूक असल्याचं म्हणत फरहानने पश्चिम बंगालच्या शिक्षण मंत्र्यांना आपला फोटो बदलण्याची विनंती देखील केली.

- Advertisement -

दरम्यान सोशल मीडियावर सध्या या गोष्टीची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर हा फोटो झपाट्याने व्हायरल होत असून, देशभरातील लोक यावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे फरहान अख्तरचे चाहते चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट  अभिनयाचं कौतुक करतानाही दिसत आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात मिल्खा सिंग ऐवजी फरहानचा फोटो छापणे ही मोठी चूक असली तरी, एखाद्या भूमिकेचा लोकांवर किती प्रभाव असतो याचंच हे उदाहरण म्हणावं लागेल. ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटासाठी फरहानने घेतलेली विशेष मेहनत आणि त्याचा दर्जेदार अभिनय याचं जितकं कौतुक चाहत्यांना आहे, तितकंच ते खु:द मिल्खा सिंग यांनाही आहे. त्यांनी वेळोवेळी मुलाखंतीमधून फरहानचं भरभरुन कौतुक केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -