घरमुंबईपैसे चोरले म्हणून त्याने १८ रिक्षा फोडल्या

पैसे चोरले म्हणून त्याने १८ रिक्षा फोडल्या

Subscribe

रात्री रिक्षात झोपलेले असताना मोबाइल आणि पैसे चोरीला गेले म्हणून फिल्मसिटीत वॉचमनचे काम करणार्‍याने एका गृहस्थाने रागाच्या भरात तब्बल १८ रिक्षांच्या काचाच फोडल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. संजय पुरुषोत्तम (वय 25) असे या वॉचमनचे नाव असून त्याचे एकूण किती पैसे चोरीला गेले आहेत, हे देखील त्याला माहित नसल्याने पोलीस ही बुचकळ्यात पडले आहे.

गोरेगाव फिल्मसिटी परिसरात संजय पुरुषोत्तम हा गेल्या अडीच वर्षांपासून वॉचमॅनचे काम करीत आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम करत असताना रात्री तो नजिकच्या गणेश मंदिर रोड परिसरात पार्किंग करण्यात आलेल्या रिक्षामध्ये झोपला. यावेळी संजय दारुच्या नशेत असल्याने त्याला शुध्द नव्हती. याचाच फायदा उचलत काही अज्ञात व्यक्तीने त्याच्या खिशातील मोबाईल व रोकड चोरत येथून पळ काढला. पहाटे उठल्यानंतर आपला मोबाइल आपल्याकडे नाही, तर खिशांत पैसे ही नसल्याने संजयचा पारा चढला. त्याने आजूबाजूला आरडाओरड देखील केली. पण मोबाइल न मिळाल्याने संजयने आक्रमक पाऊल उचलत येथे पार्किंग करण्यात आलेल्या 18 रिक्षांच्या काचा दगडाने फोडल्या. काचा फोडताना तेथील एका इमारतीच्या वॉचमनने देखील पाहिले. मात्र सकाळी पहाटे हा प्रकार घडल्यामुळे संजयचा चेहरा त्या वॉचमनला नीट पाहता आला नव्हता.

रिक्षांच्या काचा फोडल्याने सर्व रिक्षा चालकांनीसुद्धा संताप व्यक्त करत पोलीस ठाणे गाठुन या प्रकरणाचा शोध घेण्यात यावा अशी मागणी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तपासाला सुरवात केली त्यानुसार घडलेल्या परीसरातल्या आजुबाजुच्या इमारतीमध्ये याबाबत चौकशी करण्यात आली . तपासादरम्यान एका इमारतीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये संजयचा चेहरा स्पष्ट दिसला. त्यानुसार खबर्‍यांना कामाला लावुन दिंडोशी पोलिसांनी संजयचा पत्ता शोधुन काढुन त्याला अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन संजय गोरेगाव फिल्मसिटीत वॉचमनचे काम करत असुन दारुच्या नशेत त्याच्याकडुन हे कृत्य घडले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

दारूच्या नशेत 18 रिक्षांच्या काचा फोडणार्‍या संजयला अटक होताच मी अस काहीही केले नसल्याची उडवाउडवीची उत्तरे संजयने पोलिसांना दिली मात्र खाक्या दाखवताच त्याने अखेर आपला गुन्हा कबुल केला. खिशात मोजकेच पैसे आणि मोबाईल होता ते सगळे चोरीला गेल्यामुळे राग अनावलर होवुन त्याने हे कृत्य केल्याचे कबुल केले आहे. ही उत्तम कामगिरी दिंडोशी पोलिसांनी 5 ऑक्टोबर 2018 रोजी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि नित्यानंद उबाळे आणि दिंडोशी पोलीस पथकाने केली असुन काचा फोडणार्‍या संजय पुरुषोत्तमला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -