घरनवरात्रौत्सव 2022रंगीलो मारो घागरो....

रंगीलो मारो घागरो….

Subscribe

‘रंगीलो मारो घागरो....’ असो किंवा ‘ढोली तारो ढोल बाजे’ असो सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत, गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस रंगांची उधळण असते. मग ते रंग रंगीबेरंगी घागरा चोळीचे असोत वा त्यावर घालणार्‍या दागिन्यांचे! हे सगळे आपल्या जीवनातही रंग भरतात. यावर्षीही बाजारात आलेल्या नवीन ड्रेसेस व दागिन्यांचे ट्रेंड खास तुमच्यासाठी.

नवरात्रीत खेळला जाणारा गरबा दांडिया हे गुजरातचे नृत्यप्रकार असले तरीही ते महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय आहेत. या दिवसांमध्ये दांडिया खेळायला जाताना 9 दिवस रोज नवीन साज शृंगार करावा म्हणून खूप आधीपासूनच तरुणाईंची तयारी सुरु होते.

तरुणाईंच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी बाजारपेठाही सज्ज होतात. पण महागडे कपडे व दागिने घेण्यापेक्षा आपल्या आवाक्यात बसतील असे काही सुंदर मिळते का अशी शोधाशोध सुरू होते. यासाठीच यंदाच्या नवरात्रोत्सवाचा ट्रेंड जाणून घेऊया ……

- Advertisement -

* दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नव्या-नव्या फॅशन ट्रेण्ड्सची धूम आहे. बाजारात सध्या नेटच्या कपड्यांना डिमांड आहे. सलवार कमीज, साड्या, ट्रेंडी टॉप सर्व काही नेटच्या लूकमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

- Advertisement -

* महिलांसाठी अनारकली आणि अंब्रेला कट चुडीदारसहित आता विविध लेटेस्ट ट्रेंड आले आहेत. ते कम्फर्टेबल रहाण्याबरोबरच पारंपारिक लूकही देतात.

* कांजीवरम, कोटा, बनारसी, पटोल आणि चंदेरी साड्याही महिलांसाठी दांडिया खेळताना सर्वात परफेक्ट आऊटफिट ठरू शकतो.

* वेस्टर्न ड्रेसमध्ये पारंपारिक लूक मिळवायचा असेल तर डेनिमसोबत सॅटिन वा सिल्कचा शर्ट किंवा कलरफूल कुर्तीही मॅच होऊ शकेल.

* दांडिया डान्ससाठी पारंपारिक लेहंगा चोली आणि घागरा या पोषाखामुळे आकर्षक लूक मिळतो. तर त्यांच्या जोडीदारांना स्टायलिश दिसण्यासाठी पारंपारिक दांडियातील कपडे, केडीयू वापरू शकतात किंवा कुर्ता-पायजमा यासोबत कलरफूल पगडी किंवा दुपट्टा मॅचिंग करू शकतात.

* याबरोबरच इंडो वेस्टर्न कुर्ती, चुडीदार विथ दुपट्टा, नी लेंथ तसेच फ्लोर लेंथ शिफॉन तसेच कमरेपासून टाईट असलेला क्रेपचा अम्बे्रला फ्लेअर्स कुर्ता, त्याच्याखाली फ्रिलही लावलेली असेल असा नवा ट्रेण्डी ड्रेस आहे. रेडिमेड साडी, लेहंगा पॅटर्नवाली साडी, या साडीला केलेले फ्रिलवर्कही युवतींना आकर्षित करत आहे. याव्यतिरिक्त व्हर्टिकल लाईंसवाला तसेच कोरसेट लेहंगाही ट्रेंडमध्ये आहे. स्ट्रेचेबल मटेरिअलमध्ये तो बनवला जातो. यावर स्टोन, कुंदन आणि पोलकी वर्क केले जाते.

* नवरात्र म्हटले की वर्क केलेले वेगवेगळ्या डिझाइन्सचे घागरा चोळी बाजारात बघायला मिळतात. त्याप्रमाणे या वर्षीही वर्क्सच्या ड्रेसेसची फॅशन आहे. साधारणत: 500 रुपयांपासून 10- 12 हजार रुपयांपर्यंत कपडे व दागिने बाजारात उपलब्ध आहेत.

* या वर्षी घागरा चोळी कॉटन, शिफॉन आणि पारंपारिक बांधणीच्या कपड्यांमध्ये मिळते आहे. तर पुरुषांमध्ये केडीयू, धोती, पटियाला असे प्रकार दिसत आहेत.

* वर्क मध्ये जर्दोसी वर्क टिकल्या लावलेले व रात्री चमकणारे वर्क केलेल्या चनिया चोलींना कवडी वर्क केलेल्या चनिया चोळीपेक्षा जास्त पसंती मिळते आहे. कारण कवडी वर्क केलेले चनिया चोळी जास्त वजनदार असतात. गरबा खेळताना ते वजन सांभाळणे थोडे कठीण जाते.

* सिल्क, सुती अशा कपड्यांमध्येही विविध नक्षीकाम केलेले, भरतकाम केलेले 60 ते 80 कळ्यांचे घागरे ही सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

* ऑक्सिडाइज्डचे दागिने, सिल्व्हर प्लेटेड दागिने, व्हाईट, मल्टी कलर चुडा सध्या बाजारात भरपूर प्रकारात उपलब्ध आहेत.

* यासोबत आपल्या अ‍ॅक्सेसरिज आणि फूटवेअर्सही निवडताना चोखंदळपणा दाखवणे आवश्यक आहे.
या सगळ्या गोष्टी मुंबईत तुम्हाला प्रत्येक उपनगराच्या मार्केटमध्ये तर मिळतीलच; पण दादर, घाटकोपर, विलेपार्ले, कांदिवली, लिंकिंग रोड अशा ठिकाणी तर पुण्यातही अनेक ठिकाणी सहज मिळतील. पण भरपूर घासाघीस करायला मात्र विसरू नका.

जरा हटके …

जर तुम्हाला घागरा चोळी असा पारंपारिक ड्रेस घालायचा नसेल तर सरळ जीन्स घाला; पण त्याच्यावरती वर्क केलेला बांधणीचा किंवा डिझाइनर कुर्ता घाला आणि ओढणी घ्या. त्याच्यावर दागिने म्हणून ऑक्सिडाइजच्या माळा, झुमके, मांग टीका आणि हातात व्हाईट चुडा घाला. बघा, कसा ट्रेंडी लूक येईल तो. शिवाय खेळायलाही कम्फर्टेबल वाटेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -