घरमुंबईसंजय राऊत यांनी कमी बोलावे - आशिष शेलार

संजय राऊत यांनी कमी बोलावे – आशिष शेलार

Subscribe

शिवनसेनेचे नेते संजय राऊत लिलावती रुग्णालयात उपचाऱ घेत आहेत. सोमवारी रात्री त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिलावती रुग्णालयात जावून राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार देखील लिलावती रुग्णालयात गेले. त्यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत आपण राऊत यांची फक्त प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी शेलार यांनी सांगितले.


हेही वाचा – थेट रुग्णालयातून राऊत यांचे ट्विट; ‘हम होंगे कामयाब’

- Advertisement -

नेमके काय म्हणाले आशिष शेलार?

‘वैचारिक मतभेद असोत किंवा नसोत तरीही एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे हे आपल्या संस्कृतीला आणि परंपरेला धरुन आहे. आज आमचे मित्र संजय राऊतजी जे ‘सामना’चे संपादक देखील आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता आम्ही आलो होतो. यात कोणतीही राजकीय चर्चा नव्हती. किंबहुना त्यांनी तब्येतीसाठी कमीच बोलावे’, असे आशिष शेलार म्हणाले. त्याचबरोबर लिलावती रुग्णालयात भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्रताभभाई आशर उपचार घेत असून त्यांच्या देखील प्रकृतीच्या विचारपूससाठी आपण आलो असल्याचे शेलार यांनी सांगितले.

राऊत यांच्या ह्रदयात २ ब्लॉक

संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे काल दुपारी ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. काल त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या ह्रदयात २ ब्लॉक असल्याचं निष्पन्न झाले. त्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती समोर आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -