घरमुंबईमाझा आत्मविश्वास दुणावला आहे

माझा आत्मविश्वास दुणावला आहे

Subscribe

फळेगावातील स्वागताने किसन कथोरे भारावले

मुरबाड मतदारसंघाचे उमेदवार आणि आमदार किसन कथोरे हे कल्याण तालुक्यातील फळेगाव येथे रविवारी आले होते. त्यावेळी कथोरे यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली तर वृद्ध महिलांनी त्यांना ओवाळले. यावेळी गावातील शेकडो आबालवृद्ध या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांनी किसन कथोरे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या उत्साहामुळे माझा आत्मविश्वास दुणावला असल्याचे कथोरे म्हणाले.

कल्याण तालुक्यातील गेरसे, काकडपाडा, वेहले, पळसोली, उशीद ते फळेगांव अशी ही मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या प्रचार फेरीत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे, तालुका प्रमुख वसंत लोणे, बदलापूर नगराध्यक्ष वामन म्हात्रे, माजी सभापती मिनाक्षी जाधव, पंचायत समिती सदस्य रमेश बांगर, अरुण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र घोडविंदे शाहीद मुला काका, भुषण जाधव, योगेश धुमाळ, गोपाळ शेठ जाधव, रवींद्र जाधव, फळेगांव शाखा प्रमुख माणिक जाधव, भगवान जाधव सह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते तसेछ फळेगाव ग्रामस्थ, लहान मोठे तसेच लगतच्या परिसरातील सेना-भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रतिसादाने मी भारावून गेलो असून मला माझ्यावर जनतेचा विश्वास असल्याची खात्री पटली असून शिवसेनेचे कार्यकर्तेही माझ्यासोबत भाजपापेक्षा दोन पावले पुढे असल्याचे मला समाधान आहे, असे कथोरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -