घरमुंबईअनैतिक संबंधाच्या संशयातून मित्रावर प्राणघातक हल्ला

अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्रावर प्राणघातक हल्ला

Subscribe

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अंबरनाथमध्ये एकाने मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पत्नीशी मित्राचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाने मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील गंभीर जखमीवर मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Attack on friend over suspicion of immoral relationships
आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

असा केला हल्ला

अंबरनाथ (प.) येथील बुवापाडा परिसरात काल रात्री हा प्रकार घडला. अंबरनाथ (पू.) येथे राहणारा राकेश (२४) आणि बुवापाडा येथे राहणाऱ्या रवी (नावात बदल) यांची गेल्या काही वर्षांपासून मैत्री होती. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसांपासून रवीला त्याची पत्नी आणि राकेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. संतप्त झालेल्या रवीने राकेशला जीवे मारण्याचे ठरविले. त्यानुसार गुरूवारी रात्री रवीने राकेशला दारू पाजली. त्यानंतर त्याला घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर रवीने काही वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या. गप्पां दरम्यान राकेशला झोप लागली. रात्री २.३० वाजताच्या सुमारास रवीने गाढ झोपेत असलेल्या राकेशच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.

- Advertisement -

गंभीर जखमीवर जे. जे. मध्ये उपचार

या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या राकेशला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र चिंताजनक परिस्थितीमुळे डॉक्टर्सनी त्याला मुंबईतील जे. जे. हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार सध्या राकेशवर जे. जे. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. आरोपी रवीवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश करे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -