घरताज्या घडामोडीToday Petrol Diesel Price: मुंबईत पेट्रोल सेंचुरीच्या जवळ, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Today Petrol Diesel Price: मुंबईत पेट्रोल सेंचुरीच्या जवळ, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Subscribe

देशात अनेक राज्यात लॉकडाऊन असला तरी जगभरातील परिस्थिती सुधारत आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत जागतिक व्यावसायिक उड्डाणांची (Global Commercial Flights) संख्या वाढली आहे. मे २०२० पासून ते आतापर्यंत अमेरिकेत हवाई प्रवाशांची संख्या सहा पटीने वाढली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात पुन्हा तेजी दिसत आहे. त्यामुळे देशांतर्गत आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीच्या बाजारात पेट्रोलच्या किंमतीत २९ पैशांची वाढ होऊन ९२.८५ रुपये प्रति लीटर झाली आहे. तर डिझेलची किंमत २९ पैशांनी वाढून ८३.५१ रुपये प्रति लीटर झाली आहे. तसेच मुंबईतील पेट्रोलची किंमत १००च्या उंबरठ्यावर आली असून ९९.१४ रुपये इतकी झाली आहे.

मागील दोन महिन्यात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. यामुळे गेल्या महिन्यात कच्चे तेल महाग होऊनही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली आहे. परंतु यादरम्यान कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर चार हफ्तांमध्ये डिझेचे दर घटले होते. यामुळे पेट्रोल ७७ पैसे प्रति लीटर स्वस्त झाले होते. या महिन्यात पुन्हा पेट्रोलचे दर वाढू लागले. निवडणूक झाल्यानंतर ११ दिवसांत पेट्रोलचा दर २.५० पैसै प्रति लीटर महाग झाले आहे. त्याप्रमाणे डिझेलच्या दरात देखील वाढ झाली असून निवडणूक झाल्यानंतर ११ दिवसात डिझेलचे दर २.७८ रुपये प्रति लीटरने वाढले आहेत.

- Advertisement -

जाणून घ्या कोणत्या शहरात किती आहे पेट्रोल-डिझेलचे दर?

शहर       पेट्रोल किंमत          डिझेल किंमत
दिल्ली        ९२.८५                ८३.५१
कोलकाता     ९२.९२                ८६.३५
मुंबई           ९९.१४                ९०.७१
चेन्नई           ९४.५४                ८८.३४
बंगळुरू        ९५.९४               ८८.५३
हैदराबाद       ९६.५०               ९१.०४
श्री गांगननगर   १०३.८०              ९६.३०
जयपूर          ९९.३०               ९२.१८
पटना           ९५.०५               ८८.७५
लखनौ          ९०.५७               ८३.८९

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -