घरमुंबईरुग्णवाहिकेत स्ट्रेचर नसल्याने वयोवृद्ध कोरोना संशयिताचे हाल; वृद्धावर सरपटत येण्याची वेळ!

रुग्णवाहिकेत स्ट्रेचर नसल्याने वयोवृद्ध कोरोना संशयिताचे हाल; वृद्धावर सरपटत येण्याची वेळ!

Subscribe

कल्याण पूर्वेतील घटनेनंतर केडीएमसीच्या कारभारावर संताप व्यक्त

कल्याण डोंबिवलीत कोरोना संशयित रुग्णाचे हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत कोरोना संशयित वयोवृद्धाला सरपटत चौथ्या मजल्यावरुन खाली यावं लागलं, मात्र ते आल्यानंतर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली. शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्या रुग्णाला चालत जावे लागल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कल्याण पूर्वेतील हनुमान नगर येथील चार मजली इमारतीत दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्या घरातील त्यांचे ७१ वर्षीय वडील व आई हे दोघे कोरोना संशयित रुग्ण आहेत. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मुलांनी रुग्णवाहिकेला बोलवण्यास फोन केला. या दोन्ही वृद्धाना घेण्यासाठी रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली. दरम्यान या दोन्ही वयोवृद्धांना चालण्याचा त्रास असल्याने ते दोघेही चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आले. मात्र ते खाली आल्यावर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली होती. रुग्णवाहिकेच्या चालकाने थांबण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

दरम्यान रुग्णवाहिका चालकाचा उपवास असल्याने संध्याकाळी तो उपवास सोडण्यासाठी गेला होता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेकडे ३३ रुग्णवाहिका आहे. त्यापैकी काही रुग्णवाहिका महापालिकेच्या आहेत. बहुतांशी रुग्णवाहिका या भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या आहेत. रुग्णवाहिका चालकांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. त्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या नसून त्यांना सोयी सुविधा दिल्या जात नाही. यासह खाजगी रुग्णवाहिकांवर महापालिकेचे नियंत्रण नसल्याचा फटका या वयोवृद्धांना बसला असल्याचे सांगितले जात आहे.


वडाळा पोलीस ठाण्यातील शिपायाचा नाशिकमध्ये मृत्यू!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -