घरमुंबईस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन पुढील महिन्यात

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन पुढील महिन्यात

Subscribe

शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक समितीला देण्यात आल्यानंतर मागील जानेवारी २०१९ला बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला या जागेचे हस्तांतरण करण्यात आले आहे. महापौर निवासाचे हस्तांतरण झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात या स्मारकाच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्माकर समितीला शिवाजीपार्क येथील महापौर निवासाची जागा देण्यात आल्यानंतर २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्त गणेश पुजन करण्यात आले होते. मात्र, या राष्ट्रीय स्मारकाच्या नुतनीकरणाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळेच पुढील महिन्यात बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे कामाचे भूमिपुजन करण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांच्या मंगळवारी पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

- Advertisement -

दुष्काळग्रस्तच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली

दुष्काळाच्या झळांनी दुःखी कष्टी झालेल्या महाराष्ट्रतील जनतेच्या पाठीशी शिवसेनेने खंबीरपणे उभे राहण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. चारा छावण्यांवर मुक्काम करून राहिलेल्या शेतकरी कुटुंबाना पुढील दहा दिवस पुरेल इतके अन्नधान्य व इतर भोजन साहित्य पोहचण्याचे नियोजन करण्यात आले त्यानुसार दुष्काळग्रस्त चारा छावण्या असलेल्या नगर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, पुणे, बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्हयातील सुमारे २ लाख शेतकऱ्यांना पुढील दहा दिवस पुरेल इतके धान्य, स्वयंपाकासाठी लागणारे तेल, डाळी, कांदे, बटाटे इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या बैठकीस शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, विजय शिवतारे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार तानाजी सावंत, जयदत्त क्षीरसागर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होतेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -