घरमुंबईमुलुंडमधील वडाचे झाड तोडणाऱ्या कंपनीला १० हजारांचा दंड

मुलुंडमधील वडाचे झाड तोडणाऱ्या कंपनीला १० हजारांचा दंड

Subscribe

मुंबईत पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, या झाडांच्या फांद्या शास्त्रोक्तपणे न तोडता सरसकट कापणी केली जात आहे. त्यामुळे झाडांची प्रमाणापेक्षा अधिक कापणी होत असल्याने वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच मुलुंडमधील अवघ्या तीन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांच्या फांद्या छाटून त्याला बोडके केल्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तब्बल दहा हजार रुपयांचा दंड महापालिकेच्या टी विभागातील उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी लावला आहे.

मुलुंड पूर्व येथील ९० फूटी वासुदेव बळवंत फडके मार्गावर ३ वर्षांपूर्वी वड,पिंपळ,बदाम अशी १५ झाडे लावण्यात आली होती. परंतु १ जून रोजी महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने येथील वडाच्या झाडांच्या फांद्यांची अचानक छाटणी हाती घेतली. या फांद्या छाटणीच्या नावाखाली हे झाडच बोडके केले आहे. त्यामुळे ही बाब लक्षात येताच माजी आमदार शिशिर शिंदे यांनी महापालिकेच्या लक्षात ही बाब आणून ट्विटरद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे याची दखल घेत महापालिकेच्या ‘टी’ विभागाच्या उदयान अधिकारी सुर्यवंशी यांनी कंत्राटदारावर कारवाई करत त्यांना दहा हजाराचा दंड केला. महापालिकेच्या ‘टी’ विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी याला दुजोरा देत, लहान झाड असतानाही जास्तप्रमाणात फांद्यांची छाटणी केल्यामुळे ही दंडात्मक कारवाई केल्याचे आपलं महानगरशी बोलतांना सांगितले.

- Advertisement -

हे वाचा – पालिकेच्या आशीर्वादाने वृक्षतोडीचा ‘उद्योग’

मुंबईत सरसकट झाडांच्या फांद्यांच्या छाटणीच्या नावाखाली वृक्षतोडच सूरु आहे. त्यामुळे फांद्यात छाटण्यात येणारे झाड किती वर्षे जुने आहे किंवा त्यांच्या फांद्या मृत आहेत याची कोणतीही माहिती न घेता सरसकट छाटणी केली जात आहे. जी झाडे आम्ही तीन वर्षांपूर्वी लावली आहेत. ती झाडे आता कुठे तरी वाढत आहेत. परंतु त्यांच्या फांद्या अशाप्रकारे छाटून टाकल्या आहेत की त्या झाडालाच बोडके करून टाकले आहे. त्यामुळे याबाबत ट्विटरच्या माध्यमातून आपण महापालिकेचे लक्ष वेधून घेतल्यानंतर त्यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे किमान सरसकट झाडांच्या फांद्यांची जी छाटणी केली जाते त्याला लगाम बसेल असा विश्वास माजी आमदार शिशिर शिंदे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -