घरमुंबईपत्नीची हत्या करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला अटक

पत्नीची हत्या करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला अटक

Subscribe

वर्षभरानंतर ठाणे पोलिसांच्या हाती लागला

आपल्या पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसर्‍या पत्नीचे हत्या करून मृतदेह मुंबई-अहमदाबाद हायवेवर टाकून बांगलादेशात फरार झालेल्या मारेकर्‍याला ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर हत्येचा उलगडा झाला. वालीव पोलिसांनी मारेकर्‍याच्या ताबा घेतला आहे.

मेहब्बूर शेख (45) असे मारेकर्‍याचे नाव आहे. मूळचा बांगलादेशचा नागरिक असलेला मेहब्बूर शेख आपली पत्नी सीमा शेख (35) हिच्यासह नालासोपारा शहरात बेकायदेशीरपणे रहात होता. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशला जाऊन दुसरे लग्न करून पॉली शेख (21) हिलाही त्याने नालासोपार्‍यात आणले होते. पहिली पत्नी सीमा शेख आणि दुसरी पत्नी पॉली शेख (21) यांच्यात नेहमी वाद होत असे. त्यामुळे मेहब्बूर वैतागला होता. ऑक्टोबर 2018 ला दोन्ही बायकांमध्ये असाच वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या मेहब्बूरने पहिली पत्नी सीमाच्या मदतीने पॉलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या अंगावर पुरुषांचे कपडे घालून मृतदेह गोणीत भरून मुंबई-अहमदाबाद हायवेवर सातीवली गावच्या हद्दीत कोंबडीच्या कचर्‍यात टाकून दिला होता. त्यानंतर दोघेही बांगलादेशला पळून गेले होते.

- Advertisement -

मार्च 2019 ला वालीव पोलिसांना गोणीत सांगडा सापडला होता. डिएनए चाचणीत सदर सांगाडा तरुण महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले होते. मेहब्बूर आणि सीमा बांगलादेशला पळून गेल्याने पॉलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली न गेल्याने वालीव पोलिसांना तपासात यश आले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी ठाणे क्राईम ब्रँचने मेहब्बूरला एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. चौकशीत त्याने पॉलीच्या खूनाची माहिती दिली होती. त्यानंतर वालीव पोलिसांनी मेहब्बूरला ताबा घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -