घरमुंबईतुम्हीही सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करत असाल; तर हे नक्की वाचा...

तुम्हीही सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करत असाल; तर हे नक्की वाचा…

Subscribe

सार्वजनिक ठिकाणी तुम्ही मोबाइल चार्ज करत असल्यास तुमच्या फोनमध्ये मालवेअरने संक्रमित होऊन डाटा हॅक होऊ शकतो

हल्ली सगळेच मोबाईल फोन वापराच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे लवकर बॅटरी संपल्याच्या तक्रारी अनेकांकडून ऐकायला मिळतात. अशावेळी बाहेर प्रवास करताना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल फोन चार्ज केला जातो. विमानतळ, मेट्रो स्टेशन, बस स्थानक, रेस्टॉरंट तसेच मॉल अशा सार्वजनिक ठिकाणी सर्रास फोन चार्जिंगला लावला जातो. मात्र अशा ठिकाणी तुम्ही तुमचा फोन चार्ज करत असाल तर सावधान.

मालवेअरने संक्रमित होऊन डाटा हॅक

कारण या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही मोबाइल चार्ज करत असल्यास तुमच्या फोनमध्ये मालवेअरने संक्रमित होऊन डाटा हॅक होऊ शकतो. तुमच्या नकळत मोबाइल चार्जिंगला ठेवताच अवघ्या काही मिनिटात तुमचा मोबाइलचा डाटा हॅक होऊ शकतो. या संदर्भात काही महिन्यांपुर्वी ‘न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते.

- Advertisement -

युएसबीचा वापर केल्यास डाटा हॅक होण्याची शक्यता

या सर्वेक्षणात असे पुढे आले की, सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंगच्यावेळी हॅकर्स डाटा ट्रॅक करण्यासाठी एका साइड चॅनलचा वापर करतात. यात कोणतीही वायर न लावता पर्सनल माहिती काढली जाते. विशेष म्हणजे फोन जितका वेळ चार्ज केला जाईल तेवढा डाटा काढून घेतला जातो. म्हणजे फोन १०० टक्के चार्ज झाला असेल तर डाटा जलदगतीने हॅक केला जातो. अशावेळी मोबाईल फोन चार्ज करताना फोन चार्जरचा वापर न करता युएसबीचा वापर केल्यास मोबाइल डाटा अधिक हॅक होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

नुकतेच मुंबई पोलिसांनी या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देत असे सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग केल्यास त्याचा परिणाम वैयक्तिक डेटा हॅक होण्याची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -