घरनवी मुंबईBEST Bus : अटल सेतूमुळे बेस्टला फायदा, 14 दिवसांत 1.04 लाखाची कमाई

BEST Bus : अटल सेतूमुळे बेस्टला फायदा, 14 दिवसांत 1.04 लाखाची कमाई

Subscribe

मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर) मार्गे बेस्टकडून बेलापूर ते कुलाबा अशी बस वाहतूक 13 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. पण फक्त 14 दिवसांमध्ये म्हणजे 26 मार्चपर्यंत बेस्टला या बससेवेपोटी 1 लाख 4 हजार 612 रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजे सरासरी कमाईचे प्रमाण काढल्यास दररोज 07 हजार 472 रुपयांची कमाई झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (BEST Bus benefits due to Atal Setu)

हेही वाचा… Sion Bridge : सायन पुलाच्या पाडकामाचा मुहूर्त तिसऱ्यांदा पुढे ढकलला

- Advertisement -

त्यामुळे बेस्टकडे आता अटल सेतूमुळे उत्पन्नाचे एक नवीन स्त्रोत निर्माण झाले आहे. या बससेवेला आणखीन चांगला प्रतिसाद लाभला तर बसेसची संख्या व फेऱ्या वाढविल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी तसे झाल्यास बेस्टच्या उत्पन्नात तेवढीच भर पडणार आहे. कोट्यवधी रुपयांनी तोट्यात चालवल्या जाणाऱ्या बेस्टला तेवढाच आर्थिक हातभार लागणार आहे.

बेस्ट प्रशासनाने, अटल सेतूवरून 13 मार्चपासून बेस्ट उपक्रमातर्फे ‘प्रवासी बस वाहतूक’ सुरू केली. मात्र या मार्गावरून ये-जा करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला किमान 50 रुपये ते 225 रुपये मोजावे लागत आहेत. बेस्ट उपक्रमातर्फे वर्ल्ड ट्रेड सेंटर, कुलाबा कोकणभवन, सीबीडी बेलापूर दरम्यान ऍपवर आधारित एसी प्रिमियम बस बसमार्ग क्र. एस- 145 सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाकडून दररोज सकाळी सीबीडी बेलापूर येथून वर्ल्ड ट्रेड सेंटर, कुलाबापर्यंत तर संध्याकाळी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून सीबीडी बेलापूर अशी दैनंदिन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किमान 50 रुपये ते संपूर्ण प्रवासासाठी 225 रुपये तिकीट दर द्यावे लागत आहेत. या बसचा प्रवास, वर्ल्ड ट्रेड सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र (मंत्रालय), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ), पूर्व मुक्त मार्ग अटल सेतू (उड्डाणपूल) उलवे नोड, किल्ले गावठाण, बामणडोंगरी रेल्वे स्थानक कोकण भवन सीबीडी बेलापूर, असा सुरू आहे.

तसेच, कोकण भवन सीबीडी बेलापूर येथून सकाळी 7.30 पहिली बस आणि दुसरी बस सकाळी 8.00 वाजता सुटते. तसेच, वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून पहिली बस संध्याकाळी 5.30 वाजता आणि दुसरी बस 6.00 वाजता सुटते. या बसमार्गावरील बसेस सोमवार ते शनिवार धावत असून 13 ते 26 मार्च अशा 14 दिवसांमध्ये बेस्ट उपक्रमाला 1 लाख 4 हजार 612 रुपयांची कमाई झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -