घरमुंबईBMC : मुंबई पालिकेसमोर चार दिवसांत 50 टक्के थकबाकी वसुलीचे आव्हान

BMC : मुंबई पालिकेसमोर चार दिवसांत 50 टक्के थकबाकी वसुलीचे आव्हान

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे एक प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता करापोटी वर्षभरात साडेचार हजार कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट कर निर्धारण व संकलन विभागाने ठेवले होते. मात्र आजपर्यंत मालमत्ता करापोटी 2 हजार 213 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तर 50 टक्केपेक्षा जास्त म्हणजेच 2,287 कोटी रुपयांची वसुली अद्यापही बाकी आहे. 31 मार्चपर्यंत ही सर्व थकबाकी वसूल करणे आवश्यक आहे. त्यासाठीच विभाग प्रमुखांच्या आदेशाने 31 मार्चपर्यंत सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशीसुद्धा मालमत्ता कर वसुलीसाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. (BMC Challenge of 50 percent dues collection in four days before Mumbai Corporation)

मुंबई महापालिकेचे 2017 पासून जीएसटी कर पद्धती लागू होण्यापूर्वी जकात कर वसुली हे एकमेव सर्वात मोठे उत्पन्नाचे स्त्रोत होते. मात्र अगोदर ज्या जीएसटी कर पद्धती लागू करण्यास विरोध करणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेतील मित्र पक्ष शिवसेनेला बाटलीत उतरवले, विश्वासात घेतले आणि मुंबईतही जकात कर वसुली रद्द केली. सदर जकात कर वसुलीच्या नुकसान भरपाईपोटी दरमहा कोट्यवधी रुपयांचा हप्ता पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत संपुष्टात आले आहे. आता पालिकेला विकास नियोजन खाते आणि मालमत्ता कर यापोटी उत्पन्न मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –Lok Sabha 2024 : भाजपा उमेदवारांची सातवी यादी जाहीर, पण उदयनराजे भोसले अद्यापही वेटिंगवरच

चार दिवसात 50 टक्के थकबाकी वसुली बाकी

महापालिकेने मालमत्ता करापोटी चालू आर्थिक वर्षात सहा हजार कोटींचे कर उत्पन्न वसूल करण्याचे टार्गेट ठेवले होते. मात्र नंतर पालिकेने सहा हजार ऐवजी साडेचार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले. मात्र आतापर्यंत पालिकेने 2 हजार 213 कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल करण्यात यश आले आहे. अद्यापही 2 हजार 283 कोटी रुपयाची मालमत्ता कर थकबाकी रखडलेली आहे. आता 31 मार्चपर्यंत ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागासमोर आहे. त्यासाठी 31 मार्चपर्यंत पालिकेच्या 25 वॉर्डातील कार्यालयाचे दरवाजे सुट्टीच्या दिवशीही उघडे ठेवण्यात केले आहेत.

- Advertisement -

एका आठवड्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर वसुली

मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने 20 मार्चपूर्वीपर्यंत 1,200 कोटी रुपयांपर्यंत मालमत्ता कर वसुली केली होती. मात्र त्यानंतर एका आठवड्यात थकबाकीदारांकडून अंदाजे एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी वसूल करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित चार दिवसात कर निर्धारण व संकलन खात्याकडून पुन्हा एकदा उर्वरित 2,283 हजार कोटी रुपये एवढया मालमत्ता कर वसुलीसाठी जोर लावण्यात येणार आहे. मात्र मालमत्ता कर वसुलीपोटी साडेचार हजार कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याबाबत त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहेत. तसे पाहता 20 मार्च रोजी पालिकेने एका दिवसात मालमत्ता करापोटी थकीत कोट्यवधी रुपयांपैकी 100 कोटी रुपयांची थकबाकी वसुली केली होती.

हेही वाचा – Amravti Lok Sabha : नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार, भाजपाची सातवी यादी जाहीर

पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ता धारकांची यादी

  1. एस विभाग : राजेश बिजनेस लिजर्स हॉटेल प्रा. लि. – 49 कोटी 12 लाख 33 हजार 541 रुपये
  2. जी/दक्षिण विभाग : कमला मिल्‍स् लिमिटेड जॉईन्‍ट स्‍टॉक कंपनी – 20 कोटी 84 लाख 19 हजार 631 रुपये
  3. एच/पश्चिम विभाग : सिंधुकुमार वाय मेहता – 9 कोटी 58 लाख 95 हजार 908 रुपये
  4. एच/पश्चिम विभाग : गॅलेक्‍सी कॉर्पोरेशन – 8 कोटी 85 लाख 92 हजार 387 रुपये
  5. के/पश्चिम विभाग : मोहीत कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी – 8 कोटी 79 लाख 25 हजार 980 रुपये
  6. जी/दक्षिण विभाग : गौरव इन्‍वेस्‍टमेंट – 8 कोटी 58 लाख 73 हजार 536 रुपये
  7. जी/दक्षिण विभाग : न्‍यू सन मिल्‍स् कंपनी लिमिटेड – 8 कोटी 23 लाख 13 हजार 659 रूपये
  8. डी विभाग : ए. आर. जाफर – 6 कोटी 33 लाख 26 हजार 426 रुपये
  9. जी/दक्षिण विभाग : अंबिका सिल्‍क मिल्‍स् कंपनी लिमिटेड – 5 कोटी 63 लाख 7 हजार 89 रुपये
  10. डी विभाग : स्‍टर्लिंग इन्‍वेस्‍टमेंट – 4 कोटी 57 लाख 79 हजार 876 रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -