घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : पत्नीला उमेदवारी जाहीर होताच रवी राणांनी बच्चू कडूंना...

Lok Sabha 2024 : पत्नीला उमेदवारी जाहीर होताच रवी राणांनी बच्चू कडूंना हात जोडले, म्हणाले…

Subscribe

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी तर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अमरावती : भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे महायुतीत मात्र, वादाची ठिणगी पडली आहे. कारण राणा यांच्या उमेदवारीला महायुतीत शिवसेना आणि प्रहार संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे. प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी तर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पण यामुळे खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांना हात जोडले आहेत. (Navneet Rana candidature was announced, Ravi Rana requested Bacchu Kadu)

हेही वाचा… Amravati Lok Sabha : नवनीत राणांना कोणाच्या जीवावर उमेदवारी दिली? शिवसेनेचे आनंदराव अडसूळ संतापले

- Advertisement -

खासदार नवनीत राणा यांनी 2019 ला अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी विजयी झाल्यानंतर शिवसेनेला म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर त्यांनी अचानकपणे त्यांच्या विरोधात भूमिका घेत भाजपाला पाठिंबा दिला. सदैव भाजपाच्या बाजूने बोलल्याने राणा यांना त्याचेच फळ आता मिळाल्याचे बोलले जात आहे. पण यामुळे आमदार बच्चू कडू संतापले असून आमचा विरोध कायम आहे. आम्ही कायम विरोध करु, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

बच्चू कडू यांनी पुन्हा राणा यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने आमदार रवी राणा म्हणाले की, भाजपाने नवनीत राणांवर विश्वास दाखवला. देशाच्या पंतप्रधानांचे व्हिजन भाजपाच्या कार्यकर्त्या म्हणून पुढे नेण्याचे काम नवनीत राणा करतील. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कुठल्याही भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विरोध नाही. घटक पक्षांना, बच्चू कडूंना हात जोडून विनंती करतो की, जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्रासाठी मोदीजींचे हात मजबूत करा आणि नवनीत राणांना विजयी करा, अशी विनंती रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांना केली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते बच्चू कडू?

आमचा विरोध कायम आहे. आम्ही कायम विरोध करु. आम्ही केलेल्या तक्रारीचा काही उपयोग झाला नाही. आम्ही आता बघू, एकंदरीत काय रणनीती आहे त्यापद्धतीने उमेदवार द्यायचा का, याबाबत निर्णय घेऊ. आम्ही नवनीत राणा यांचा शंभर टक्के प्रचार करणार नाही. नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही. याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार, असे बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले होते. तर, आम्ही आता विरोध केल्याने आम्हाला महायुतीत ठेवायचे किंवा नाही, हा महायुतीच्या नेत्यांचा प्रश्न आहे, असेही कडू यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -