घरमुंबईमुंबईकरांचा प्रवास होणार 'बेस्ट'; १५०० एसी इलेक्ट्रीक, सिंगल डेकर गाड्या दाखल

मुंबईकरांचा प्रवास होणार ‘बेस्ट’; १५०० एसी इलेक्ट्रीक, सिंगल डेकर गाड्या दाखल

Subscribe

निविदा प्रक्रिया सुरु असल्याचा बेस्ट उपक्रमाची माहिती

मुंबईत ४० वातानुकूलित ४० इलेक्ट्रीक बस गाड्यांपैकी १० बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच पाच मिनी बसगाड्या देखील दाखल झाल्या आहेत. लवकरच १ हजार मिनी वातानुकूलित बसगाड्या तसेच ५०० मिडी सिएनजी बसगाड्या मार्च २०२० पर्यंत दाखल होणार आहे. याव्यतिरिक्त ५९० वातानुकूलित इलेक्ट्रीक तसेच १ हजार वातानुकूलित सिंगल डेकर बसगाड्यांसाठीही निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले.

- Advertisement -

आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला प्रथम ६०० कोटी रुपये आणि त्यानंतर ११३६.३१ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याने या अनुदानाची रक्कम बँकेंचे कर्ज फेडण्याऐवजी बेस्टने काही रक्कम स्वत:कडेच राखून ठेवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. यावर उत्तर देताना बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापकांनी, महापालिका आयुक्तांसोबत केलेल्या चर्चेनुसार अनुदानापैकी ७० टक्के अनुदानाच्या रकमेचा वापर उच्च दराने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी करावा आणि ३० टक्के रक्कम प्रलंबित कायदेशीर देणी आणि प्रलंबित पुरवठादारांची थकीत बिले देण्यासाठी वापरावीत, असे नमुद करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यानुसार महापालिकेकडून घेतलेल्या अनुदानाच्या रकमेतून ९ बँकांमधील ७९५.१२ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात आल्याचे उपक्रमाने म्हटले आहे. तर इतर प्रलंबित देणे आणि थकीत रक्कम यासाठी ३३५ कोटी रुपये अशाप्रकारे ११३६.३१ कोटी रुपयांच्या अनुदानाच्या रकमेचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आतापर्यंत महापालिकेने बेस्टला दिलेल्या १७३६.३१ कोटी रुपयांच्या अनुदानामुळे बेस्टवरील वार्षिक ७५.५९ कोटी रुपयांच्या वाज्याच्या रकमेची बचत झाली असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.


हेही वाचा – बेस्टच्या तिजोरीत खुळखुळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -