घरताज्या घडामोडीBEST Electric Bus : बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बस दाखल होणार

BEST Electric Bus : बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बस दाखल होणार

Subscribe

बेस्ट बसच्या (BEST BUS) ताफ्यात येत्या काळाता 2100 नव्या इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. बेस्टकडून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीला (Olectra Greentech Limited) या इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट देण्यात आले आहे.

बेस्ट बसच्या (BEST BUS) ताफ्यात येत्या काळाता 2100 नव्या इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. बेस्टकडून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीला (Olectra Greentech Limited) या इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट देण्यात आले आहे. याबाबत बेस्टकडून इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला रितसर पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रदुषण कमी होण्याची शक्यता आहे.

बेस्टच्या (BEST) ताफ्यात दाखल होणाऱ्या 2100 इलेक्ट्रिक बसेससाठी 3675 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या करारानुसार, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी 12 मीटर एसी बसेस पुरवणार आहे. सध्यस्थितीत या कंपनीच्या 40 बसेस बेस्टच्या ताफ्यात आहेत. बेस्टकडून इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला रितसर पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार १२ वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई पोलिसांनाही ‘बेस्ट’चं तिकीट बंधनकारक; मोफत प्रवास होणार बंद

12 महिन्यांच्या कालावधीत या इलेक्ट्रिक बसेस वितरित केल्या जाणार आहेत. तसेच, ऑलेक्ट्रा कंपनीमार्फत या बसेसची देखभालही या कराराच्या कालावधीत करणार आहे. दरम्यान, राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Tourism and Environment Minister Aaditya thackeray) यांनी या इलेक्ट्रिक बसेससाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते. तसेच, जानेवारीत त्यांनी याबाबत ट्विट करुन याची माहितीही दिली होती.

- Advertisement -

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांनी जानेवारी महिन्यात याबाबत ट्विट करत राज्यात येत्या काळात इलेक्ट्रिक बस धावणार असल्याच घोषणा केली होती. त्यावेळी मुंबईत 900 इलेक्टिक डबलडेकर बसेस लवकरच धावतील अशीही माहिती त्यांनी दिली होती. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील इतर शहरांतही या इलेक्ट्रिक बसेस धावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, इव्हे आणि ऑलेक्ट्रा या कंपन्या देशातील विविध राज्यातील परिवहन उपक्रमांत इलेक्ट्रिक बसेस चालवत आहेत. यामध्ये पुणे, हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.


हेही वाचा – उद्यापासून या सरकारला जुम्मे के जुम्मे सरकार म्हणायचं, पाणी टंचाईवरुन रावसाहेब दानवेंचा आक्रोश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -